वृत्तसंस्था : आजकाल सर्वकाही ऑनलाइन डिजिटल पद्धतीने होते. आता कोणत्याही गोष्टीचे पेमेंट करताना अनेकजण यूपीआयचा वापर करतात. अनेकांच्या खिशात तर रोख रक्कमदेखील नसते. ऑनलाइन शॉपिंगपासून ते एसआयपी सर्वकाही ऑनलाइन यूपीआयद्वारे केले जातात. दरम्यान, यूपीआय वापरणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी आहे. यूपीआयबाबत महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. १५ सप्टेंबरपासून यूपीआय ट्रान्झॅक्शनच्या लिमिटमध्ये मोठा बदल होणार आहे. एनपीसीआय म्हणजे नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडियाने हा निर्णय घेतला आहे. यामुळे डिजिटल देवाणघेवाण खूप सोपी आणि सुरक्षित आहे.
आतापर्यंत यूपीआयच्या माध्यमातून तुम्ही १ लाखांपर्यंत ट्रान्झॅक्शन करायचे. परंतु आता काही श्रेणींमध्ये ही मर्यादा कमी करण्यात होती. त्यामुळे आता NPCI ने मोठा निर्णय घेतला आहे. NPCI ने १२ कॅटेगरीतील ट्रान्झॅक्शनची सीमा ५ लाख रुपये करण्यात आली आहे. याचसोबत दिवसाला पेमेंट करण्याची मर्यादादेखील वाढवली आहे. यूपीआयच्या या नवीन नियमाचा फायदा त्यांना होणार आहे जे लोक वीमा प्रिमियम भरतात किंवा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करतात. याचसोबत क्रेडिट कार्ड बिल भरणाऱ्यांना होता. याचसोबत ट्रॅव्हल किंवा बिझनेससंबंधित ट्रान्झॅक्शन करु शकतात.
UPI ट्रान्झॅक्शनची लिमिट –
- कॅपिटल मार्केटमध्ये तुम्ही १० लाखांपर्यंतपैसे गुंतवू शकतात.
- विमा प्रिमियमची सीमा लाखांवरुन १० लाख करण्यात आली आहे.
- सरकारी ई-मार्केट प्लेसचीही लिमिट ५ लाखांवरुन १० लाख करण्यात आली.
- ट्रॅव्हल बुकिंगसाठीदेखील १० लाखांचे ट्रान्झॅक्शन करु शकतात.
- क्रेडिट कार्डसाठी तुम्ही ६ लाखांचे ट्रान्झॅक्शन करु शकतात.
- ज्वेलरीसाठी ६ लाखांपर्यंत पेमेंट करु शकतात.
पर्सन टू पर्सन ट्रान्झॅक्शनवर कोणताही परिणाम होणार नाही. पर्सन टू पर्सन पैसे पाठवण्यासाठी १ लाख रुपयांची लिमिट आहे. या लिमिटमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. NPCI ने सांगितले की, लोक खूप जास्त प्रमाणात डिजिटल पेमेंट करत आहेत. त्यामुळे मोठ्या रक्कमेचे ट्रान्झॅक्शन करण्याची मागणी वाढत आहेत. त्यामुळे यूपीआयमध्ये हा बदल खूप गरजेचा आहे.






