मुंबई : मुंबईत पुन्हा एकदा पावसाने कहर केला आहे. मुंबईत रात्रीपासून मुसळधार पाऊस सुरु असल्याने जनजीवन विस्कळित झाले आहे. मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली असून लोकल ट्रेन २० ते २५ मिनिटे उशिरा धावत आहेत. तसेच मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागांत पाणी साचले आहे आणि वाहतूक कोंडी झाली आहे. तर दुसरीकडे अंधेरी सबवेला नदीचं रुप धारण केल्याचे पाहायला मिळत आहे.
आज (२५ जुलै) सकाळपासून मुंबई आणि उपनगरात मुसळधार पावसाने सुरुवात केली आहे. याचपार्श्वभूमीवर आज (२५ जुलै) दिवसभर मुंबईला ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. मुसळधार पावसामुळे मुंबईतील अनेक भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली आहे तर मुंबईतील लोकल वाहतूकीवर याचा परिणाम दिसून येत आहे. पश्चिम उपनगरात काही वेळेसाठी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा दहा ते पंधरा मिनिटांपासून पावसाचा जोप वाढला आहे. या जोरदार पाऊस सुरु असल्यामुळे पुन्हा पश्चिम उपनगरात सखल भागात पाणी भरायला सुरुवात होत आहे. तसेच पावसामुळे मध्य आणि पश्चिम रेल्वेची वाहतूक मंदावली आहे.
पश्चिम रेल्वेची सद्यस्थिती : पश्चिम रेल्वे लोकल सेवा दर १० ते १५ मिनिट उशीराने धावत आहेत.
मध्य रेल्वेची सद्यस्थिती : मध्य रेल्वेच्या लोकल सेवा दर १५ ते २० मिनिटे उशीराने धावत आहे.







