मुंबई : समाजात अजूनही महिला सुरक्षित नाही, हीचेच एक उदाहरण म्हणजे नुकतीच चेंबूर परिसरातील घटना. काम संपवून घरी जात असलेल्या एसटी वाहकाने महिला प्रवाशाची एसटीत छेड काढल्याचा प्रकार मंगळवारी रात्री चेंबूर परिसरात घडला. याबाबाद महिला प्रवाशाच्या तक्रारीवरून गोवंडी पोलिसांनी गुन्हा दाखल करून तो भोईवाडा पोलिसांकडे वर्ग गेला. सदर तक्रारदार तरुणी तिच्या आजीला सोडण्यासाठी लालबाग येथून सातारा येथे जात होती. याच बस मधून वाहक विलास मुंडे काम संपवून नवी मुंबईत घरी जात होता. त्याने बस मधील महिला प्रवाशाची छेद काढण्यास सुरुवत केली.
बराच वेळ त्याचा हा प्रकार सुरू असल्याने महिलेने ही बाब वाहकाला सांगितली. वाहकाने तत्काल बस चेंबूर परिसरात थांबवून आरोपीला त्याच ठिकाणी उतरवले. या घटनेनंतर प्रवाशांनी बराच वेळ ही बस चेंबूर परिसरात रोखून धरली होती. शेवटी बसमधील वाहकाने याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार पोलिसांनी घटना स्थळी धाव घेतली आणि प्रवाशांची समजूत काढली. त्यानंतर तरुणीला पोलिस ठाण्यात नेण्यात आले. तिच्या तक्रारीवरून आरोपी विलास मुंडे विरोधात गुन्हा दाखल केला. मात्र ही घटना लालबाग परिसरातील असल्याने हा गुन्हा भोईवाडा पोलिसांकडे वर्ग करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळताच राज्य परिवहन विभागाने आरोपी विलास मुंडे याच्यावर कारवाई सुरू केली आहे.







