मुंबई : जयपुरहून मुंबईस उड्डाण करणाऱ्या विमानामध्ये बॉम्ब असल्याची धमकी देणारी चिठ्ठी सापडल्याचा प्रकार समोर आला आहे. विमानाने सोमवारी सायंकाळी सात वाजता जयपुरहून उड्डाण घेतल्यावर सुमारे २० मिनिटांनी कर्मचाऱ्याना शौचलयात चिठ्ठी सापडली.
रात्री ९ च्या सुमारास विमान मुंबईत सुरक्षितरीत्या उतरवण्यात आले. त्यानंतर त्वरित तपासणी सुरू केली. दरम्यान कोणतीही धोकादायक वस्तू सापडली नाही. परंतु, याप्रकरणी अज्ञात व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विमानतळ पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्यानी दिलेल्या माहितीनुसार अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलमांतर्गत १२५ ( निष्काळजीपणामुळे जीवितास धोका निर्माण करणारे कृत्य ), ३५१(४) ( ओळख लपवून धमकी देणे ), ३५३(१)(ब) ( जनतेमध्ये घाबरट निर्माण करणारी विधाने करणे ) या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिस अधिक तपास करीत आहेत.







