नवं वर्ष सन. प्रारंभ नवीन वर्ष क्रिस्ती वर्ष असं म्हटलं जातं. सूर्य भ्रमण करणाऱ्या वेळे नुसार चालणारं वर्ष चक्र त्यावर आधारित वर्ष चक्र जानेवारी ते डिसेंबर. हिंदु धर्म नुसार चंद्र भ्रमण वेळेवर आधारित कालदर्शक वर्ष चक्र चैत्र ते मार्गशिर्ष. गुढीपाडवा हा आपल्या नवं वर्ष्याचा पहिला दिवस. ते आपलं नवं वर्ष. हे झालं कालगणना सुरु झाल्या पासून चे क्रिस्त अन हिंदू यांनी ठरवलेलं वर्ष. कालगणना सुरु झाली सूर्य अन चंद्र यांच्या फिरण्याच्या वेळे नुसार सुरु झालेलं काल चक्र तेच कालगणना वर्ष म्हणून गणलं जाऊ लागलं. तत पुर्व पूर्वी सुद्धा काल गणना माणुस करतं होता पण पद्धत वेगवेगळ्या होत्या साऱ्यांच्या. वर्ष्यातील ऋतु सुद्धा दोन पण आपण मानतो तीन. चार चार महिन्याचे तीन ऋतु मानतो आपण पण तेच ईतर ठिकाणी दोन मानतात तसंच. आपल्या आपल्या सोई नुसार गणना पण केली जातं होती. जसं सात जून पासून आपल्याकडे पावसाळा सुरु होतो म्हणून काही ठिकाणी जून पासून वर्ष चक्र सुरवात मानून त्या नुसार गणना केली जायची जून हा वर्ष्याचा पहिला दिवस मानला जायचा त्या नुसार वर्ष्याचं वेळापत्रक दिनदर्शिका केली जायची. कालमापन पद्धती ह्या पूर्वापार चालतं आलेल्या पद्धती पण काळ मोजण्याची पद्धत वेगवेगळी होती त्या नुसार दिनक्रम अन वर्ष महिना मोजण्या ची पद्धत वेगळी वेगळी जरी असली वर्ष चक्र सर्वांचे सारखंच असायचं. दिवस अन रात्र २४ तासाचीच म्हणून वर्ष मोजणी कुठून पण कोणत्या पण दिवसा पासून सुरवात केली तरी पुन्हा फिरून दिवस सारखा म्हणून वर्ष पण सारखंच 365 दिवसाचं सर्वांचे यायचं. पृथ्वी अन चंद्र सूर्य यांचं फिरणं सारख्याच वेळेवर फिरणं. दिवस सारखा तर रात्री पासून मोजणी चंद्र केंद्र स्थानी मानून मोजणी सुरु केली काय अन सूर्य केंद्र स्थानी मानून मोजणी सुरु केली काय फरक तो फक्त बारा तासांचा किंवा सहा तासांचा इतकाचं पडतं असे बस. कोण पाऊस सुरु झाला की काल मोजणी सुरु करे कोण हिवाळा सुरु झाला की सुरु करे कोण उन्हाळा सुरु झाला की करे पण फिरून फारून वर्ष एकच येतं ३६५ दिवसाचं. दिवस चोवीस तासाचा येतो हे नक्कीच. हे झालं” काल चक्र ”
“काल चक्र” फिरतं असतांना. काल चक्रात सूर्य फिरण्या नुसार किंवा चंद्र नुसार वर्ष मोजण्याची पद्धत रुजली. पण भ्रम्हांड खुप मोठं आहे. काल गणना तर या नुसार होते. पण ईतर ग्रह अन तारे आपल्या सौर मालेतील खुप आहेत. पृथ्वी भोवती सूर्य अन चंद्र तर आहेत पण त्या सोबत ईतर ग्रह तारे उपग्रह असे खुप आहेत. पूर्वी नवग्रह सौर मालेत आहेत असं मानलं जायचं पण तद नंन्तर नेपच्युन प्ल्यूटो ई. ग्रह शोध लागला. पण मुख्य नवग्रह नुसार दिनदर्शिका सुरु झाली दिनांक दिनदर्शिका नुसार वर्ष गणना सुरु झाली. वर्ष ठरलं ठरवलं पूर्वज यांनी तसंच. ग्रह वेळ काळ हा कोणता ग्रह कधी कोणत्या ठिकाणी आहे.त्या नुसार कोणत्या ग्रहाची गुरुत्व आकर्षण शक्ति किती याचा अभ्यास पूर्वज यांनी केला. पृथ्वी पासून कोणता ग्रह किती अंतरावर आहे. सौर मालेतील सारे ग्रह स्वतः भोवती फिरता फिरता इतरांच्या भोवती सुद्धा फिरतात त्या नुसार अभ्यास केला. काळ वेळ अन त्या ग्रहाची स्थिती नुसार पृथ्वी वर असलेलं आपलं ठिकाण कोणतं कोण कोणत्या ठिकाणी आहे. अन त्या ठिकाणावर कोणत्या ग्रहाची गुरुत्व शक्ति त्या ठिकाणी प्रभाव टाकतेय त्या नुसार पंचांग ठरवलं गेलं. पृथ्वी वरील जीव या सर्व जीव जीवनावर त्या सौर मालेतील साऱ्यांचा प्रभाव पडतं असतो. त्या नुसार कोणत्या ठिकाणी कोणत्या ग्रहचा प्रभाव आहे. त्या नुसार राशीं ठरली म्हणजेच त्या ग्रहाचा प्रभाव म्हणून त्या राशीत जन्मला त्या ग्रहाची राशीं प्रभाव नुसार राशी ठरली. संपुर्ण सौर मालेतील सूर्य, चंद्र, ग्रह, तारे, यांच्या फिरण्या नुसार राशी चक्र. पंचांग ठरलं.म्हणजेच काळ वेळ ग्रह स्थिती प्रमाणे संपुर्ण सौर माळेचा सौर माळाचं आहे. सारे ग्रह गोलाकार माळे सारखेच फिरतं असतात. सारा अभ्यास करून सारं ग्रह चक्र अन ग्रहाच्या चक्र नुसार सृष्टी जीव जीवन प्रभाव काय त्या प्रमाणे राशी चक्र प्रभाव पंचांग उदयास आलं. हिंदू धर्मातील भारतातील पंचाग. जगात सर्व भाकीत सांगणारं काल दर्शक पण सध्या मागे पडतांना दिसतं. विज्ञान अभ्यास करतांना फिरून फारून पंचाग वार तिथी या सर्व गोष्टी आधीच लिहल्या गेल्यात नंन्तर पंचाग महत्व समजतं. जानेवारी पासून जगात सर्वदूर जास्तीत जास्त नव्हे सर्वदूर हे जगमान्य असं कालगणना मान्य करून तेच सर्वीकडे प्रसिद्ध झालं. ईतर कालगणना ई.वेळेपासून सुरु होणारी वर्ष गणना मागे पडलीत असंच आहे. असं वाटतं त्या त्या भु भागात त्या त्या गणना पद्धत हि सध्यातरी मर्यादित राहिल्यात आहेत असंच आहे. जसं आपलं नवं वर्ष चैत्र मास पासून सुरु होणारं वर्ष सुद्धा मागे पडलं फक्त मराठी भु भागात हिंदु बहुल भागा पुरतं राहिलं असंच वाटतं. जगात इंग्रजी भाषा आणि इंग्रजी काल गणना वर्ष सुद्धा जगात सर्वदूर पसरली असंच. त्याला कारण जगात खूपच भु प्रदेशावर इंग्रज राजवट यांचा प्रभाव होता. त्यांनी जगात अनेक ठिकाणी राज्य केलंय म्हणून अन जग मान्य असं वर्ष, टाईम वेळ गणना भाषा सुद्धा इंग्रजी इंग्रज यांच्या पद्धतीने पद्धत जगमान्य झपट्यानं झालीय. म्हणून आपण सुद्धा मराठी वर्ष आपल्या पुरतं मर्यादित ठेवून जगा सोबत इंग्रजी वर्ष मान्य करतं जानेवारी पासून सुरु होणारं वर्ष मान्य करतं सोहळा करतं असतो अन येतोय. म्हणून इंग्रजी वर्ष आनंद व्यक्त करतं कालदर्शक वर्ष साजरा करतोय. ईतर सारी गणना पद्धत मागे पडतं चाललीय असंच.
प्रदीप मनोहर पाटील (जिल्हा. जळगाव)






