नवी दिल्ली : भारताचे माजी राष्ट्रपती आणि ‘मिसाईल मॅन’ डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्तसहाय्यक निवासी आयुक्त नितीन शेंडे यांनी कोपर्निकस मार्ग स्थित जुने महाराष्ट्र सदन येथे त्यांच्या प्रतिमेस पुष्पांजली वाहून अभिवादन केले.
सहाय्यक निवासी आयुक्त स्मिता शेलार, उपअभियंता किरण चौधरी, प्र. उपसंचालक मनीषा पिंगळे, व्यवस्थापक प्रमोद कोलपते, सहायक लेखाधिकारी निलेश केदारे, यांच्यासह अधिकारी-कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी महाराष्ट्र सदन व्यवस्थापक प्रमोद कोलपते यांनी डॉ. एपीजे अब्दुल कलाम यांच्या कार्याचा आणि जीवनप्रवासाचा परिचय उपस्थितांना करून दिला.








