वेळ आणि परिस्थिती सतत बदलत असते. पृथ्वी जशी फिरतं राहते अगदी तशीच वेळ अन परिस्थिती बदलत राहते. आज जे आहे उदया ते नसेल. आज नव्हे आता जे आहे ते क्षणात बदलत असतं. क्षणा क्षणात सारं बदलत असतं असंच आहे. भ्रमण संक्रमण सदैव सुरु असणारी प्रक्रिया. म्हणून आज जे अस्तित्व आहे उदया किंवा थोडया वेळात तेच तसंच अस्तिव असेलच असं नाही. म्हणून जे आहे त्यात समाधान अन नसलेल्या बद्धल वाईट वाटून नं घेणं ह्यात अंतरंगी समाधान मानणे हेच महत्वाचं. तसेच शरीर जे मिळालं त्याचा कधीच गर्व नं करणं अन जे आहे आपल्याकडे त्याचाही गर्व नं करणं हेच सुखी समाधानी योग्य अन समृद्ध जीवन सूत्र असंच मी म्हणेल. आहे त्यात इतरांना देतं राहणं मदत करणं अन आपलं आयुष्य सार्थकी करतं राहणं. जगतं असताना पुण्य कर्म करतं राहणं. अन उर्वरित आयुष्य सुखात जगणं ह्या साठी कर्म पुण्य पदरात असणं खुप महत्वाचं.अन गेल्या नंन्तर जनमानसात आपण आठवणीत उरण्यासाठी जगतं असतांना माणसात राहतोय तर माणुस म्हणून जगतं राहणं हेच आयुष्य जगणं असंच मी म्हणेल.
कुणालाही नं दुखवता कोणाला अपमानित नं करता आयुष्यात कोणी अपमानित होणार नाही बोलतांना ती काळजी घेतं राहणं हेच जीवन सूत्र अंगीकार करणं मनात ठरवणे महत्वाचं . त्यांच मार्गांवर चालणं महत्वाचं. व्यक्ती कोणीही कधीही कमजोर किंवा ताकतवर राहतं नाही.सारा भ्रम आहे.अंगात टाकत आहे उदया नसेल म्हणून प्रेमानं वागणं महत्वाचं. दादा खुप झालेत आलेत तशेच गेलेत असंच असतं आज हा दादा आहे तर उदया तो दादा हि अविरत चालणारी प्रक्रिया आहे. सर्वच बाबतीत असंच असतं. आज गरीब उदया गरीबचं असेल असं नाही. किंवा मी खुप मोठा, श्रीमंत, जमीनदार, सावकार, उदयोगपती, असंच काहीतरी प्रत्येकाला वाटतं असतं. पण वास्तविकता वास्तव जसं आलोय तसंच जाणार हेच सत्य सारं सारं येथेच राहणार. जन्माला यायच्या अगोदर शून्य होतो गर्भ अंकुरताना शून्यातून निर्मिती झाली निर्गुण निराकार होतो. जन्म शरीर धारण करून आला तसं शरीर गेलं परत तसंच शून्य. असंच येतांना शून्य क्षणात भाग्य बदलत असतं. तसंच परिस्थिती वेळ पण बदलत असते असंच माझं मत. परिस्थिती वर गर्व किंवा नाही म्हणून चिंता करू नये वाटतं. वेळ बदलेल नक्कीच असतं. असो लिहण्या सारखं खुप आहे. पण बदल हा निसर्ग, सृष्टी, अन सौर माळेचा नियम. हेच लक्षात ठेवतं थोडक्यात थांबतो.
– प्रदीप मनोहर पाटील (जिल्हा. जळगाव)






