नवी दिल्ली : १ एप्रिलपासून नवीन कामगार कायदा लागू झाला आहे. यामुळे कामगारांना फायदा होणार आहे. आता नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना दोन दिवसात फायनल सेटलमेंट मिळणार आहे. या कर्मचाऱ्यांना पूर्ण पैसे मिळणार आहे. याआधी नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्यांना पैसे मिळण्यासाठी ४० ते ४५ दिवसांची वाट पाहावी लागायची. परंतु आता या नवीन कामगार कायद्यामुळे फायदा होणार आहे. सरकारने नवीन कामगार कायदा लागू केला आहे. याअंतर्गत तुम्हाला पूर्ण पैसे दोन दिवसात मिळणार आहेत. त्यांना आता पैसे मिळण्यासाठी जास्त दिवसांची वाट पाहावी लागणार नाही.
१ एप्रिल २०२६ पासून लागू झालेल्या नवीन नियामनुसार, कंपन्यांना कर्मचाऱ्यांसाठीच्या फायनल सेटलमेंटचे काम दोन दिवसात पूर्ण करायचे आहे. हा नियम वेतन संहिता २०१९ अंतर्गत लागू करण्यात आला आहे. या नवीन तरतुदीनुसार, जर एखाद्याने कंपनी सोडली किंवा त्याला कामावरुन काढून टाकले तर कंपनीने दोन दिवसात फायनल सेटलमेंट करायची आहे. या प्रक्रियेला ३० ते ९० दिवस लागायचे. फूल अँड फायनल सेटलमेंट म्हणजे नोकरी सोडल्यानंतर कर्मचाऱ्याला देय असलेल्या रक्कमेची गणना करणा आणि ती कर्मचाऱ्यांना देणे. यामध्ये पगार, भत्ता आणि इतर सुविधांचा समावेश आहे. मागील महिन्याचा पगार, काम केलेल्या दिवसांवर आधारित पगार मिळणार आहे. कामगिरीनुसार बोनस आणि प्रोत्साहनची रक्कम मिळणार आहे. आता कर्मचाऱ्याला १ वर्ष पूर्ण झाल्यानंतर ग्रॅच्युटी मिळते. हे पैसे ३० दिवसांच्या आत दिले जाणार आहे.यामुळे कर्मचाऱ्यांना दोन दिवसात सर्व पैसे मिळणार आहेत.





