मुंबई : कधी देशातील सर्वात श्रीमंत असलेल्या अनिल अंबानी यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होत आहे. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कंपन्या मोठ्या कर्जाच्या दबावाखाली आहेत. एका मोगोमाग एका कंपन्यांची विक्री होत असताना अनिल अंबानींचा साम्राज्य उध्वस्त होण्याच्या उंबरठ्यावर उभा आहे. अनिल अंबानी एकेकाळी जगातील पहिल्या १० अब्जाधीशांपैकी एक होते, तर आता त्यांनी स्वतःला पूर्णपणे दिवाळखोर जाहीर केले असून आता त्यांना आणखी एक झटका बसणार आहे. आर्थिक संकटाचा सामना करणाऱ्या अनिल अंबानी यांच्याकडून महाराष्ट्र सरकार पाच विमानतळे परत घेण्याची तयारी करत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्र विधानसभेत सांगितले की, सरकार लवकरच अनिल अंबानी समूहाकडून लातूर, उस्मानाबाद, नांदेड, यवतमाळ आणि बारामती विमानतळ परत घेऊ शकते.
महाराष्ट्र सरकारने २००८-२००९ मध्ये अनिल अंबानी यांच्याकडे बारामती, नादेड, उस्मानाबाद, लातूर आणि यवतमाळ विमानतळांच्या विकासाचे काम सरकारकडून सोपवण्यात आले होते. परंतु कंपनीची आर्थिक स्थिती कोलमडल्याने अंबानींची कंपनीना विमानतळाची देखभाल करत आहे ना थकबाकी भरत आहे. त्यामुळे आता महाराष्ट्र सरकार रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्सकडून ही विमानतळे परत घेण्याच्या विचारात आहे. या पाचही विमानतळांसाठी रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडने सर्वाधिक ६३ कोटी रुपयांची बोली लावली गेली होती. रिलायन्स एअरपोर्ट डेव्हलपर्स लिमिटेडकडून थकबाकी कशी वसूल करायची याबाबत सरकार ॲटर्नी जनरल यांच्याकडून कायदेशीर मत मागणार असल्याचे फडणवीस यांनी सांगितले. तसेच, त्याऐवजी सरकार विमानतळाचा पूर्ण ताबा घेऊ शकते का, याबाबत मत जाणून घेण्यात येणार आहे. विधानसभेत बोलल्यानंतर फडणवीस यांनी ट्विट केले की, नांदेड, लातूर विमानतळाचे काम ठप्प झाले आहे. ज्या कंपनीला हे काम दिले होते त्यांनी थकबाकी भरलेली नाही. ॲटर्नी-जनरल यांचे मत घेतले जाईल आणि आम्ही हे काम जलद करू. यासोबतच त्यांनी त्या ट्विटमध्ये विमानतळाशी संबंधित इतर प्रकल्पांची माहिती दिली होती.