पुणे : पुणे महापालिका भवनाच्या आवारात तसेच महापालिकेचे क्षेत्रीय कार्यालय, अन्य कार्यालयांच्या आवारात दुचाकी वापरणारे कर्मचारी व अधिकाऱ्यांना हेल्मेट सक्ती करण्यात आलेली आहे. हेल्मेट नसेल तर आवारात प्रवेश देऊ नये व गाडी लावू देऊ नये असे आदेश अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी. पी. यांनी काढले आहेत. देशभरात रस्ते अपघातांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढलेली आहे. दुचाकीच्या अपघातांची संख्या अधिक असून, हेल्मेट न वापरल्याने प्राणांतिक अपघातांची संख्या जास्त आहे हेल्मेटचा वापर केल्यास डोक्याला मार लागण्यापासून बचाव होऊ शकतो व त्यातून अनेकांचे प्राण वाचू शकतात.
पुणे शहरांमध्ये दुचाकी स्वरांची संख्या मोठी आहे. अनेकांचे अपघात देखील होतात. पण हेल्मेट वापरण्याचे प्रमाण कमी आहे. राजकीय पक्ष व संस्थांकडून देखील हेल्मेट सक्तीला विरोध केला जातो. त्यामुळे शहरात केवळ सीसीटीव्ही द्वारे हेल्मेट न वापरणाऱ्या दुचाकी स्वरांवर कारवाई केली जाते. आदित्यनाथ यांची भेट. अतिरिक्त आयुक्त पृथ्वीराज बी पी यांनी काढलेल्या आदेशाची अंमलबजावणी न झाल्यास संबंधित कर्मचारी तसेच विभाग प्रमुखांवर कारवाई करण्यात येणार आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना हेल्मेट वापरणे बंधनकारक असून त्याकडे दूर्लक्ष केल्यास संबंधित अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांच्या महाराष्ट्र नागरी सेवा नियमा अंतर्गत शिस्तभंगाची कारवाई केली जाणार असून त्यानुसार दंड आकारणी तसेच याची नोंद सेवा पुस्तकात केली जाणार आहे, असे परिपत्रकात नमूद केले आहे.





