वृत्तसंस्था : जर तुम्ही अँड्रॉईड स्मार्टफोन वापरत असाल आणि तुमचा मित्र आयफोन वापरत असेल आणि तुम्हाला त्याला एखादी फाईल शेअर करायची असे तर मोठं टेंशन असतं. कारण आतापर्यंत आयफोनसाठी उपलब्ध असलेलेल एयरड्रॉप अँड्रॉईड यूजर्ससाठी उपलब्ध नव्हते. मात्र आता असं होणार नाही. कारण आता एयरड्रॉप केवळ आयफोन किंवा अॅपलपुरते मर्यादित राहिलेले नाही. आता अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील ही नवीन सर्विस सुरु केली जाणार आहे. अॅपल इकोसिस्टमसाठी एक मोठा फायदा म्हणून पाहिले जाणारे एअरड्रॉप आता अँड्रॉइड यूजर्ससाठी देखील उपलब्ध असेल. शेअरींग फीचर एअरड्रॉप आयफोन यूजर्सना वेगाने फाईल शेअर करण्याची सुविधा ऑफर करतो. आता गूगलने देखील हे फीचर क्रॅक केले आहे. त्यामुळे आता लवकरच हे फीचर अँड्रॉईड डिव्हाईससाठी जारी केलं जाणार आहे. हे फीचर कोणत्या स्मार्टफोन यूजर्सना मिळणार आणि याचा यूजर्सना कसा फायदा होणार आहे.







