नवी दिल्ली : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना जारी करण्यात आली आहे. प्रवाशांच्या सुरक्षिततेला प्राधान्य देत रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत सर्व रेल्वे गाड्यांमधील मोबाईल चार्जिंग पॉईंट्स बंद ठेवण्याच्या नियमाची आता देशभरातील सर्व रेल्वे विभागांमध्ये कडक अंमलबजावणी केली जाणार आहे. रेल्वे बोर्डाने याबाबत सर्व विभागीय कार्यालयांना स्पष्ट निर्देश दिले असून, नियमांचे उल्लंघन झाल्यास संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाईचा इशाराही देण्यात आला आहे. अलीकडेच एका रेल्वे डब्यात चार्जिंगला लावलेल्या पॉवर बँकेचा स्फोट होऊन डब्यात धूर पसरल्याची घटना घडल्यानंतर रेल्वे प्रशासन अधिक सतर्क झाले आहे.
या पार्श्वभूमीवर रात्रीच्या वेळेत चार्जिंग पॉईंट्सचा वीजपुरवठा बंद ठेवण्याचे आदेश पुन्हा कठोरपणे लागू करण्यात आले आहेत. वरिष्ठ अधिकारी रात्रीच्या वेळी अचानक तपासणी करून चार्जिंग सुविधा बंद असल्याची खात्री करणार असून, कर्मचाऱ्यांना यासाठी विशेष प्रशिक्षण आणि मार्गदर्शनही दिले जाणार आहे. रात्री चार्जिंग बंद ठेवण्याचा नियम नवीन नसून, २०१४ मध्ये नांदेड एक्स्प्रेसमधील आगीनंतर सुरक्षेच्या दृष्टीने तो लागू करण्यात आला होता. त्यानंतर २०२१ मध्येही या नियमाची अंमलबजावणी करण्याबाबत रेल्वेने पुन्हा सूचना दिल्या होत्या. मात्र, अलीकडील घटनेनंतर आता या नियमाचे काटेकोर पालन करण्यावर भर देण्यात आला आहे. प्रवाशांनी प्रवासाला निघण्यापूर्वी मोबाईल, लॅपटॉप, पॉवर बँक आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे पूर्णपणे चार्ज करून घ्यावीत, असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. रात्री ११ ते पहाटे ५ या कालावधीत चार्जिंग सॉकेट्समध्ये वीजपुरवठा उपलब्ध नसणार असल्याने प्रवाशांनी त्य

