मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचे सुपूत्र अमित ठाकरे यांनी महापालिकात निवडणुकीत दुबार मतदार करणाऱ्यांना जाहीर इशारा दिला आहे. दुबार मतदार दिसला तर फोडणारच असं अमित ठाकरे म्हणाले आहेत. राज ठाकरे प्रत्येक सभेतून दुबार मतदारांना थोबडवण्याचा इशारा देत असताना, आता अमित ठाकरेही तीच भाषा बोलताना दिसत आहेत. नगरपालिका निवडणुकांपासूनच महाविकास आघाडीचे नेते दुबार मतदानाचा मुद्दा उपस्थित करत निवडणूक आयोगाकडे कारवाईची मागणी करत आहेत. तर दुसरीकडे शिवसेना आणि मनसे त्यांना फटके लगावणार असल्याचं सांगत आहेत.
“दुबार मतदारांना तिथल्या तिथे फोडणार असं अमित ठाकरेंनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटलं आहे. ते म्हणाले की, “दुबार मतदारांना आम्ही तिथल्या तिथे फोडणार. अनधिकृतपणे तुमच्यासोबत रांगेत उभं राहून मतदान करणार. मग तुमच्या आमच्या मतदानाचा हक्क कुठे गेला? आपल्या मतदानाची काय किंमत राहिली?,” अशी विचारणा अमित ठाकरेंनी केली आहे. “जर बाहेरच्या राज्यातून येऊन आपल्यालाच सांगणार असतील की, हा माणूस आपल्यावर राज्य करणार आहे. महाराष्ट्रात तुम्ही ४० लाख मतदार घुसवलेत. विकास केल्यानंतरही तुम्हाला सत्ता पाहिजे म्हणून. हे छान चालू आहे तुमचं,” अशी टीकाही त्यांनी केली आहे.







