• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

जी २० परिषद बैठका: पंतप्रधानांचा विविध राज्यातील मुख्यमंत्र्यांशी संवाद, जी २० परिषद बैठकांसाठी मुंबई सज्ज- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे  

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
December 10, 2022
in महाराष्ट्र, मुंबई, राजकीय
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतात येत्या वर्षभरात होणाऱ्या जी २० परीषदेच्या बैठका आणि कार्यक्रमांच्या पूर्वतयारीबाबत आढावा घेण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांचे राज्यपाल, उपराज्यपाल आणि मुख्यमंत्र्यांशी दूरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. महाराष्ट्रात दि. १२ डिसेंबरपासून जी २० परिषदेच्या बैठकांना मुंबईत सुरूवात होणार असून त्यासाठी मुंबई शहर सज्ज झाले आहे. राज्याची सांस्कृतिक परंपरा, खाद्यसंस्कृतीचे दर्शन घडवितानाच राज्यात गुंतवणूकीसाठी क्षमता असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील परदेशी पाहुण्यांना करून दिली जाईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी दिली. जगभरातील देशांमध्ये तिथल्या निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावणाऱ्या जी २० परिषदेशी संबंधित सुमारे १ लाख लोक आपल्याकडे येत आहेत. त्यांच्यापर्यंत आपल्या राज्यांचे ब्रँडींग करण्याची सुवर्णसंधी असल्याचे पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले. भारतातील प्रत्येक राज्याचे नाव जागतिकस्तरावर निघाले पाहिजे, अशाप्रकारे आयोजन करा. त्यामध्ये समाजातील सर्वच स्तरातील लोकांचा सहभाग करून घ्या, असे आवाहनही पंतप्रधानांनी यावेळी केले. आपल्या देशातील राज्यांची समृद्ध विविधता दर्शविण्याची ही योग्य वेळ असल्याचे सांगत महिलांच्या नेतृत्वाखाली सामाजिक, आर्थिक आदी क्षेत्रात जो विकास झाला आहे त्याचे दर्शन या बैठका आणि कार्यक्रमांच्या माध्यमातून घडवावे, असे आवाहन पंतप्रधानांनी यावेळी केले. जी २० परिषद कार्यक्रमांच्या आयोजनातून सर्वांनी मिळून राज्यांची ताकद दाखविण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही त्यांनी सांगितले. बैठका आणि कार्यक्रमांच्या यशस्वी आयोजनासाठी आपल्या राज्यांमधील विदेश सेवेत काम केलेल्या निवृत्त अधिकाऱ्यांचा सहभाग करून घ्यावा. अन्य राज्यांनी केलेल्या आयोजनाच्या अभ्यासासाठी आपल्या राज्यातून अधिकाऱ्यांना पाठवावे. प्रत्येक राज्याने बैठका आणि कार्यक्रमांच्या काळात सुरक्षेवर विशेष लक्ष केंद्रीत करतानाच सामान्यांची गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी, असे पंतप्रधान श्री. मोदी यांनी यावेळी सांगितले. पंतप्रधान श्री. मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशाला जी २० परिषदेचे अध्यक्षपद मिळाले ही सर्व देशवासियांसाठी अभिमानास्पद बाब आहे. परिषदेच्या बैठकांसाठी महाराष्ट्राची निवड केल्याबद्दल मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी पंतप्रधानांचे आभार मानले. यावेळी विविध राज्यातील मुख्यमंत्री यांनी आपापल्या राज्यात होणाऱ्या बैठका आणि कार्यक्रम यासंदर्भातील नियोजनाची माहिती दिली. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी प्रास्ताविक केले तर केंद्रीय परराष्ट्र मंत्री जयशंकर यांनी जी २० परिषदेविषयी माहिती दिली. मुंबईत १३ ते १६ डिसेंबर याकाळात विकास विषयक कार्यगटाची बैठक होणार आहे. मुंबई शहराच्या सजावटीमध्ये कुठलीही उणीव भासू देऊ नका, असे सांगतानाच परिषदेसाठी येणाऱ्या परदेशी पाहुण्यांचे महाराष्ट्राच्या परंपरेनुसार फेटे बांधून स्वागत करावे असे निर्देश मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी अधिकाऱ्यांना यावेळी दिले. पंतप्रधानांच्या बैठकीनंतर मुख्यमंत्र्यांनी संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेत त्यांना सूचना दिल्या. मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, राजशिष्टाचार विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आदी यावेळी उपस्थित होते. मुंबईची ओळख असलेले कोळी बांधव आणि त्यांचे पारंपारिक वेशातील कोळी नृत्याने पाहुण्यांचे स्वागत करतानाच राज्याची खाद्यसंस्कृती, लोककला यांचे दर्शन घडवितानाच महाराष्ट्र गुंतवणूकीसाठी संधी असलेल्या क्षेत्रांची ओळख देखील जी २० परिषदेतील पाहुण्यांना झाली पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. जी २० परिषदेच्या वर्षभरात सुमारे २१५ विविध बैठका आणि कार्यक्रम होणार आहेत. त्यातील १४ बैठका महाराष्ट्रात होणार असून मुंबईत ८, पुणे ४, औरंगाबाद आणि नागपूर प्रत्येकी एक अशा बैठकांचे स्वरूप आहे.

Previous Post

समृद्धी महामार्गाचे रविवारी पंतप्रधानांच्या हस्ते लोकार्पण ; समृद्धी महामार्ग राज्याच्या समृद्धीची भाग्यरेषा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Next Post

मुंबईत महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

मुंबईत महारोजगार मेळाव्यात विविध कंपन्यांमधील ९ हजार २७८ रिक्त जागांसाठी मुलाखती संपन्न

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (39)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,018)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (423)
  • नवी मुंबई (191)
  • नागपूर (87)
  • नाशिक (61)
  • पालघर (58)
  • पालघर (43)
  • पुणे (891)
  • पुणे जिल्हा (185)
  • महाराष्ट्र (1,137)
  • मुंबई (2,926)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (220)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (361)
  • वसई-विरार (6)
  • विशेष लेख (614)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (181)

Follow Us

Recent News

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

कर्मचाऱ्यांची प्रतीक्षा संपली! राजीनामा दिल्यानंतर ४८ तासांत होणार सर्व हिशोब; १ एप्रिलपासून नवा नियम लागू

April 4, 2026
११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

११ वर्षांनंतर स्वामी पुन्हा भेटीला! ‘देऊळ बंद २’च्या प्रदर्शनाचा मुहूर्त ठरला; ‘या’ दिवशी येणार भेटीला

April 4, 2026
रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

रिक्षा चालकांनो सावधान! मराठी बोलता येत नसल्यास परवान्यावर गंडांतर? प्रताप सरनाईक यांचे फेरपडताळणीचे आदेश

April 4, 2026
अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

अमेरिकन वैमानिकाला पकडणाऱ्याला मिळणार सरकारकडून मोठे बक्षीस आणि सन्मान – इराणच्या राज्यपालांची घोषणा

April 4, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION