वृत्तसंस्था : ईपीएफओ कर्मचाऱ्यांच्या खात्यात दर महिन्याला पीएफचे पैसे जमा केले जातात. कंपनीद्वारे हे पैसे जमा केले जातात. पीएफचे पैसे कर्मचाऱ्यांच्या पगारातून कट केले जातात. यामध्ये नियोक्त्याकडूनही काही पैसे जमा केले जातात. दरम्यान, आता ज्या कंपन्या ईपीएफओ खात्यात पीएफचे पैसे जमा करत नाही त्यांची चौकशी केली जाणार आहे.कर्मचाऱ्यांसाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.
गुरुग्राम जिल्ह्यातील ३० पेक्षा जास्त कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांचा पीएफ ईपीएफओ खात्यात जमा न केल्याची माहिती समोर आली आहे. नवीन नियमांनुसार, ईपीएफओ याबाबत चौकशी करु शकत नाही. परंतु आता ईपीएफओने अधिकाऱ्यांकडे परवानगी मागितली आहे. या परवानगीनंतर या कंपन्यांवर कारवाई केली जाणार आहे. गुरुग्राममध्ये १३ हजार व्यवसाय रजिस्टर आहेत. शेकडो व्यवसाय हे कोणत्याही रजिस्ट्रेशनशिवाय सुरु आहेत. या कंपन्यांमध्ये हजारो कर्मचारी काम करतात. या कर्मचाऱ्यांचे पीएफ खात्यात पैसे जमा केले जात नाही. ज्या कर्मचाऱ्यांचे पीएफ जमा होत नाही, त्यांच्याकडून ईपीएफओमध्ये तक्रार करण्यात आल्या आहेत. यामध्ये डिफॉल्ट कंपन्यांवर कारवाईची मागणी केली जात आहे. या कंपन्यांची पाहणी करण्यासाठी ईपीएफओने सेंट्रल अॅनालिसिस इंटेलिजेंस यूनिटकडून परवागी मागतली आहे. ही परवानगी मिळाल्यानंतर चौकशी केली जाईल. त्यानंतर कारवाई केली जाईल.






