मुंबई : महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जिवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती समोर आली आहे. मुंबई पोलिस नियंत्रण कक्षाला धमकी देणारा कॉल आल्याची माहिती समोर आली आहे. मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रात येण्याची शक्यता आहे. त्यादरम्यानच मोदी यांना धमकी देणारा कॉल आल्याने खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुंबई पोलीस मुख्य नियंत्रण कक्षाला धमकीचा कॉल आला आला. पंतप्रधान नरेंद्र मोदींना जिवे मारण्याचा प्लॅन झाला असल्याचा महिला कॉलरने दावा केला आहे. धमकीचा फोन येताच मुंबई पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. पोलिसांनी याप्रकरणी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलाय. शितल चव्हाण असे फोन करणाऱ्या महिलेचं नाव आहे.
महाराष्ट्रामध्ये सत्तास्थापनेच्या हालचालींना वेग आलाय. अमित शाह आणि महायुतीच्या नेत्यांमध्ये आज बैठक होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील मुख्यमंत्यांच्या शपथविधीला येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजकीय घडमामोडी वेगात घडत असतानाच मुंबई पोलिसांच्या नियंत्रण कशाला मोदींना जिवे मारण्याच्या धमकीचा फोन आल्याने खळबळ उडाली. पोलिसांनी फोन करणाऱ्या महिलेला ताब्यात घेतलं. पोलिसांकडून फोन करणाऱ्या महिलेची कसून चौकशी करण्यात येत आहे. धमकीच्या फोनमध्ये किती तथ्य आहे, याबाबत माहिती घेतली जात आहे.