मुंबई : मुंबई शहराची जीवनवाहिनी म्हणून लोकल ट्रेनची ओळख आहे. लोकल ट्रेनने प्रवास करायचा म्हटलं तर तिकीट काढणे अत्यंत महत्त्वाची बाब आहे. मात्र, असे अनेक प्रवाशी आहे जे अजूनही लाबंच लांब रागेत उभं राहतात, याच समस्येवर तोडगा आता मध्य रेल्वेनी काढलेला आहे.
लोकल ट्रेनचे तिकीट काढणे प्रवाशांसाठी अतिशय सोपे व्हावे यासाठी, यासाठी मध्य रेल्वेने आता नवीन सुविधा सुरू केली आहे. ती म्हणजे एटीव्हीएम, यूटीएस प्रणाली आणि मोबाइल यूटीएस सेवेनंतर आता मोबाइल यूटीएस सहाय्यक. पहिल्यांदा ही सुविधा छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर ही गेल्या ३१ ऑक्टोबरपासून सुरू झाली आहे. या सुविधेमुळे फक्त १३ दिवसांतच रेल्वेने २०.३३ लाख रुपये महसूल मिळवला आहे. जेव्हा तिकीट काढण्यासाठी प्रवाशी लाईनमध्ये थांबतात तेव्हा तिकडे ३ सहाय्यक व्यक्ती असतात जे प्रवाशांना तिकीट काढून देतात आणि त्यांचा वेळ वाचवतात. ज्यांना ‘एम-यूटीएस सहाय्यक’ असे म्हणण्यात येत आहे.







