जीव मनुष्य असो वा कोणताही. जीव जीवन जगतं असतांना जीवन कसं जगतोय हे पाहिलं जातं. त्यालाच कर्म म्हटलं जातं. माणुस येतांना फक्त शरीर घेऊन येतो जातांना कर्म सोबत घेऊन जातो. “जसं ज्याचं कर्म तसं त्याचं फळ ” असं सर्वच धर्म ग्रंथ सांगतात. म्हणून आपल्या जीवाला मनुष्य देह मिळाला हे आपलं भाग्य. शरीर मनुष्याचं मिळालं तर माणुस म्हणून जगणं तसं कर्म सोबत घेऊन जाणं खुप मोलाचं असतं. देह विरून जातो पण जगलेल्या पाऊलवाटा पुसल्या जातं नाही. कर्मात उरतात. ईतर शिल्लक मनुष्य अन नवीन येणारे जनमानसात कोण कसं जगलं त्याची आठवण ठसा हा शरीर धारी बघत असतात. त्या नुसार चांगलं वाईट वागतं असतात. कसं जगावं ठरवत असतात. पूर्वी होऊन गेलेल्यांचा जसा ठसा हा उमटतो अगदी तसाच ठसा हा जीव जीवन जगतांना सुद्धा मोलाचा महत्वाचा आहे. माणसांच्या माझ्या मतां नुसार सुष्म निर्गुण निराकार हि पहिली अवस्था दुसरी शुक्राणू, तिसरी बीज अंडधारी मादी ज्याला मादी गर्भ म्हणतो त्यात अंडाशय मधील अवस्था. चवथी शरीर घेऊन बाहेर पडणं बाल अवस्था. बाल ते वृद्ध अवस्था ह्या अवस्थे मध्ये तरुण ह्या तीन अवस्थेतून जातं असतांना. तरुणपण हे खुप महत्वाचं. तारुण्यात जे कार्य करतो त्याची दखल सर्वात जास्त घेतली जाते त्याचं अवस्थेत माणुस कसा जगतो वागतो कुठं राहतो काय करतो हे आवरजून बघितलं जातं. म्हणून त्या अवस्थेत असतांना बाल ते तारुण्यात पदार्पण करतांना सोबत संगत खुप महत्वाची आहे. जसं उदाहरण म्हणून सांगतो. पाण्याचा एक थेंब, चिखलात पडला तो संपतो. मातीमोल होतो किंमत शून्य. तोच थेंब योग्य हातावर पडला तर उन्हात चमकतो. चमक त्याची मनाला ओलं वाटून सुद्धा भावुन जाते. तोच थेंब एखाद्या शिंपल्यात पडला तर त्याचं थेंबाचा मोती होतो. थेंब तोच असतो पण फरक हा कुठं गेलात कुठं पडलात तुमची कुठं असण्याची स्थिती तुमची चमक अथवा मूल्य ठरवत असते. म्हणून म्हटलं संगत सुद्धा महत्वाची आहे. कुणात उठबस आहे त्यावर माणुस मूल्य जनताच जनतेत राहतं असतांना करतं असते.
तरुण अवस्थेत आपण काय करतो त्याचे परिणाम सर्वीकडे उमटत असतात. केलेलं कार्य त्याचं कर्तृत्व त्याची छाप आजूबाजूला सर्व्हिकडं असते. जनमानसात चर्चा याचं तरुणाई ची असते. त्याचं नाव असतं पण कोण कोणाचा मुलगा, परिवार कोणतं, भाऊबंद कोणते, धर्म, जात,गाव, तालुका, जिल्हा, राज्य, देश कोणता हे बघितलं जातं. चांगलं कार्य असेल तर सर्व्हिकडं वाह वाह होते. वाईट असेल तर वरील नमूद केलेले सर्वांची मान खाली जाते. वरील सर्वांचा त्यात काडीमात्र संबंध नसतो पण तरी त्यांच्या नावाचा उद्धार होतो. विदेशात असलो तर भारतीय खुप चांगले असतात असं म्हटलं जातं. कोणा एकाचे कार्य वाईट असलं तर सहज म्हटलं जातं भारतीय वाईट असतात. अगदी तसंच आपल्या आई वडिलांचा काहीच दोष नसतांना त्यांना वाईट म्हटलं जातं तसंच योग्य वर्तन असलं तर चांगलं सुद्धा म्हटलं जातं. याचा अर्थ आपल्या जगण्याचा ठसा हा जनमानसात उमटत असतो. म्हणून तरुणाई मध्ये ठसा असा पडला पाहिजे. पडलेली ठस्याची छाप हि अजरामर झाली पाहिजे. गेल्या नंन्तर सुद्धा उमटली पाहिजे. आजपर्यंत जी महान पुरुष होऊन गेलीत त्यांनी ह्या तरुण वयात केलेलं कार्य हेच त्यांना आयुष्यभर पुरलं नंन्तर लोकांनी त्यांचे विचार डोक्यात घेतले. डोक्यावर धरलं.पुस्तकं अन इतहासात उरलेत. म्हणून तरुणपणात सोबत संगत योग्य असेल तर दिशा योग्य ठरून मार्गदर्शन योग्य मिळालं जोडीदार मित्र सवंगडी चांगले असले की योग्य वाटचाल होतं असते असंच वाटतं. तरुणपणात मार्ग चुकला की संपलं सारं म्हणून संगतं सोबत सोबती खुप मोलाचे असतात. तरुणपणात आईवडील, भाऊ, बहीण, गुरुजी, मित्र, मैत्रीण, यांचा सहकार्यातून योग्य मार्गक्रमण केलं तर जीवन सुखर होतं. म्हणून जीव जीवन सुंदर अवस्था हि तारुण्याची असंच मी म्हणेल. नाचत बागडत हसत खेळत मार्ग काढतं योग्य बस्तान बसवण्याची कार्य तत्पर राहत कार्य करण्याची अवस्था ती हिच अवस्था. तरुणपण हेच सुदंर क्षण जगण्याचं उपभोग घेण्याचं बहुमूल्य कार्य करण्याचं उत्तम शरीर मन बुद्धिमत्ता बुद्धी चालवण्याचं चालण्याचं योग्य चाणक्ष कार्य कुशल शरीर अवस्था हिच. बालपण ते वार्धक्य मधील सुंदर सोनेरी आठवणीतील क्षण ती अवस्था ती तरुण अवस्था. बालपण लक्षात राहतं नाही वर्धक्यात कार्य होतं नाही झालं तर कमी प्रमाणात होतं म्हणून बहुमूल्य स्वकक्तृत्ववावर जगण्याची गगन भरारी घेण्याची. हंस सारखं चमकण्याची वाघ, सिहं, सारखा दरारा निर्माण करण्याची अवस्था. दरारा हवा पण राज्या सारखं वागतं माणुस म्हणून माणसातील राजा व्हावं. क्रूर प्राण्या सारखं वागून दरारा नकोच. असो या सुंदर अवस्थे वर लिहायला पुस्तकं अपूर्ण पडतील म्हणून लेख स्वरूपात अगदी थोडक्यात लिहलंय गोड मानून घ्यावं लिहताना चुकलं असेल ते प्रदीप चं माझं समजावं.चांगलं असेल ते आठवणीत ठेवतं सर्वांचं समजावं. मीही वर्ध्याक्याच्या उंब्रठ्यावर येऊन ठेपलेला तरुण अवस्था संपण्याच्या काळातील आपलाच सोबती आठवणीत राहावा छाप्यात ठस्यात उमटवावा हाच यातून प्रयत्न.
प्रदीप मनोहर पाटील (जिल्हा. जळगाव)






