• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home विशेष लेख

ध्यानातून व्यक्ती आणि समाजात जागतिक शांततेचा प्रवास

admin by admin
December 30, 2025
in विशेष लेख
0
ध्यानातून व्यक्ती आणि समाजात जागतिक शांततेचा प्रवास
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मानवजातीच्या इतिहासात शांततेचा शोध हा नेहमीच गहन, अविचलित आणि अत्यंत आवश्यक राहिला आहे. युद्ध, हिंसा, अन्याय, सामाजिक असमानता, धार्मिक व वांशिक द्वेष अशा अनेक संकटांनी भरलेल्या जगात “शांतता” हा शब्द केवळ आदर्श ठरला आहे; प्रत्यक्ष अनुभव मात्र अनेकदा दुर्मिळ ठरतो. आजचे जग वेगवान, तणावपूर्ण, स्पर्धात्मक आणि माहितीप्रधान आहे, जिथे व्यक्ती बाह्यदृष्ट्या प्रगत होत असली तरी अंतर्मनात असुरक्षित, कलहग्रस्त आणि मानसिकदृष्ट्या थकलेली आहे. अशा परिस्थितीत, ३१ डिसेंबर रोजी साजरा होणारा ‘जागतिक शांतता ध्यान दिवस’ हा केवळ सांकेतिक दिवस नाही, तर तो व्यक्तीला आत्मपरीक्षण, अंतर्मुखता, मानसिक स्थैर्य आणि सामाजिक-सौहार्द साधण्याची अनन्यसाधारण संधी देणारा दिवस ठरतो. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून शांतता ही केवळ युद्धाचा अभाव नसून, ती सामाजिक समरसता, विश्वास, सहकार्य, सहिष्णुता आणि परस्पर आदर यांच्या जिवंत अनुभवाशी निगडित आहे. व्यक्तीच्या मनात द्वेष, भीती, असुरक्षितता आणि तणाव असल्यास सामाजिक संस्था, कुटुंबव्यवस्था आणि राजकीय रचना कितीही सक्षम असल्या तरी त्या अस्थिर राहतात. त्यामुळे शाश्वत शांततेचा पाया व्यक्तीच्या अंतर्मनात घातला पाहिजे. या संदर्भात ध्यानाचा सामाजिक दृष्टिकोन अत्यंत महत्वाचा ठरतो, कारण ध्यान केवळ मानसिक स्थैर्य निर्माण करण्याचे साधन नाही, तर त्याचा प्रत्यक्ष परिणाम व्यक्तीच्या वर्तनावर, समाजातील संवादावर आणि सामाजिक संरचनेवरही दिसतो. ध्यान हे केवळ आध्यात्मिक साधन नसून मानसिक, भावनिक आणि सामाजिक स्वास्थ्य साधण्याचे एक शक्तिशाली माध्यम आहे. भारतीय परंपरेत ध्यान, योग आणि चिंतन यांना आत्मशुद्धी आणि समाजसुधारणेची साधने मानले गेले आहेत. महात्मा बुद्ध, महावीर, पतंजली तसेच संत परंपरेतील विचारवंतांनी ध्यानाच्या माध्यमातून अहिंसा, करुणा, समत्व, संयम आणि सामाजिक जबाबदारी यांचे महत्त्व अधोरेखित केले. आधुनिक समाजशास्त्रातही ध्यानाकडे ‘मानसिक आरोग्य सुधारणा’, ‘तणाव व्यवस्थापन’ आणि ‘सामाजिक समरसता वृद्धिंगत करणे’ ह्या दृष्टिकोनातून पाहिले जाते. ध्यानामुळे व्यक्ती स्वतःच्या भावनांशी जुळते, वर्तन नियंत्रित होते, निर्णयक्षमतेत सुधारणा होते आणि सहिष्णुता, करुणा व सामाजिक जाणीव वाढते. आजच्या समाजात तणावाचे स्वरूप बहुआयामी झाले आहे. बेरोजगारी, आर्थिक असुरक्षितता, कौटुंबिक कलह, शैक्षणिक स्पर्धा, शहरीकरण, सामाजिक माध्यमांचा अतिरेक, राजकीय ध्रुवीकरण आणि पर्यावरणीय संकटे यामुळे व्यक्तीच्या मनावर सातत्याने ताण निर्माण होतो. या तणावाचे रूपांतर अनेकदा हिंसा, गुन्हेगारी, कौटुंबिक कलह, व्यसनाधीनता आणि सामाजिक असहिष्णुतेत होते. अशा परिस्थितीत ध्यान व्यक्तीला स्वतःशी जोडते, मन शांत करते आणि प्रतिक्रियात्मक वर्तनाऐवजी विवेकपूर्ण प्रतिसाद देण्याची क्षमता विकसित करते. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून व्यक्ती आणि समाज यांच्यात गहन परस्पर संबंध आहे. व्यक्ती अस्वस्थ असेल तर समाज अस्वस्थ होतो; समाज अस्वस्थ असेल तर व्यक्ती अधिक अस्वस्थ बनतो. ध्यानाची प्रक्रिया या दुष्चक्राला तोड देते. जेव्हा व्यक्ती नियमित ध्यान करते, तेव्हा संयम, आत्मनियंत्रण, सहानुभूती आणि सामाजिक समरसतेची जाणीव जागृत होते. कौटुंबिक नातेसंबंध सुधारतात, कार्यस्थळी संघर्ष कमी होतात, शाळा-महाविद्यालयांत सहकार्य वाढते आणि समाजात विश्वास व सहिष्णुतेची भावना बळकट होते. अशा प्रकारे ध्यान ही वैयक्तिक साधना असली तरी तिचा परिणाम सामूहिक आणि सामाजिक स्वरूपाचा ठरतो.

‘जागतिक शांतता ध्यान दिवस’ वर्षाच्या अखेरीस येतो, ही बाबही प्रतीकात्मक आहे. संपूर्ण वर्षभराच्या धावपळीचा, संघर्षाचा, यश-अयशाचा, वेदना-आशेचा लेखाजोखा घेण्याची ही संधी असते. समाज म्हणून आपण कुठे चुकलो, कुठे द्वेष वाढवला, कुठे संवाद तुटला, कुठे मानवी मूल्ये दुर्लक्षित केली, याचे चिंतन करण्याची वेळ आहे. ध्यानाच्या माध्यमातून ही आत्मपरीक्षणाची प्रक्रिया अधिक अर्थपूर्ण, सखोल आणि स्थिर होते. जागतिक पातळीवरही परिस्थिती संवेदनशील आहे. युद्धे, दहशतवाद, धार्मिक व वांशिक संघर्ष, विस्थापन, आर्थिक विषमता आणि पर्यावरणीय संकटे यांमुळे जग अस्थिर झाले आहे. आंतरराष्ट्रीय करार, कायदे आणि संस्था यांची भूमिका महत्त्वाची आहे; परंतु फक्त बाह्य उपाययोजना शाश्वत शांतता निर्माण करू शकत नाहीत. शाश्वत शांततेसाठी मानसिक स्थैर्य, नैतिक जाणीव, सहिष्णुता आणि करुणा आवश्यक आहेत. ध्यानाद्वारे व्यक्तीमध्ये ही मानसिक स्थैर्य आणि सहानुभूती निर्माण होते, जी सामाजिक बदलाला चालना देते. आज अनेक देशांमध्ये शाळा, रुग्णालये, कारागृह, लष्कर आणि कार्यालयांमध्ये ध्यानाचा उपयोग केला जातो. उद्दिष्ट फक्त कार्यक्षमता वाढविणे नसून मानसिक आरोग्य सुधारणा, सामाजिक समरसता व सहानुभूती वृद्धिंगत करणे हेदेखील आहे. समाजशास्त्रीय अभ्यास दर्शवितात की ध्यान करणाऱ्या व्यक्तींमध्ये आक्रमकता कमी, सहानुभूती अधिक, निर्णयक्षमतेत सुधारणा आणि सामाजिक नियमांचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढते. त्यामुळे ध्यानाचे सामाजिक परिणाम व्यक्तिविशेषापेक्षा व्यापक असतात, आणि ते समाज सुधारण्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण ठरतात. भारतीय समाजाच्या संदर्भात ध्यानाचे महत्त्व अधिक अधोरेखित होते. विविधता, बहुसांस्कृतिकता, धर्म, भाषा, जातीय भिन्नता यांमुळे शांत सहअस्तित्व राखणे आव्हानात्मक आहे. अशा समाजात कायदे आवश्यक आहेत, परंतु अंतर्मनातून सहिष्णुता, समभाव आणि करुणा निर्माण करणाऱ्या साधनांची गरज आहे. ध्यान ही प्रक्रिया व्यक्तीच्या मनातून द्वेष, द्वंद्व आणि प्रतिस्पर्धात्मक भावना दूर करून ‘मी आणि तो’ या संकल्पनेला ‘आपण’ या व्यापक भावनेत रूपांतरित करते.

‘जागतिक शांतता ध्यान दिवस’ हा दिवस फक्त ध्यान करणाऱ्यांचा दिवस नाही; तो समाजातील प्रत्येक घटकासाठी आत्मचिंतन, सुधारणा आणि सामाजिक जाणीव वाढविण्याचा दिवस आहे. शिक्षकांसाठी हा विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण देण्याचा दिवस आहे; पालकांसाठी मुलांशी संवाद सुधारण्याचा दिवस; राजकारण्यांसाठी सत्तेपेक्षा सेवा व संवादावर भर देण्याचा दिवस; सामान्य नागरिकांसाठी द्वेष, हिंसा आणि अफवा यांना नकार देऊन शांत संवाद स्वीकारण्याचा दिवस आहे. समाजशास्त्रीय दृष्टिकोनातून ध्यान ही एक ‘सॉफ्ट सोशल टेक्नॉलॉजी’ आहे. ती कोणावर लादता येत नाही; परंतु स्वीकारली गेली तर समाजात सकारात्मक बदल घडवू शकते. ध्यानामुळे निर्माण होणारी शांतता निष्क्रिय नसून सजग, संवेदनशील आणि जबाबदार नागरिक घडवते. अशा नागरिकांकडूनच न्याय्य, समतावादी आणि शांततामय समाजाची उभारणी शक्य होते. आजच्या डिजिटल युगात, जिथे प्रतिक्रिया वेगवान आणि संवेदनांचा अभाव असतो, तिथे थांबून श्वासाकडे लक्ष देणे, मन शांत करणे आणि दुसऱ्याच्या वेदना समजून घेणे ही क्रांतिकारी कृती ठरते. ‘जागतिक शांतता ध्यान दिवस’ आपल्याला ही शांत क्रांती साध्य करण्याची आठवण करून देतो, ज्यामुळे व्यक्तीपासून समाजापर्यंत सकारात्मक ऊर्जा पोहोचते आणि दीर्घकालीन सामाजिक सौहार्द व सामूहिक कल्याण घडते. शेवटी असे म्हणता येईल की शाश्वत जागतिक शांतता फक्त राष्ट्राध्यक्षांच्या बैठका, आंतरराष्ट्रीय करार किंवा कायद्यांमधून निर्माण होत नाही; ती प्रत्येक व्यक्तीच्या अंतर्मनातून जन्माला येते. ध्यान ही प्रक्रिया अंतर्मनात शांततेचे बीज रोवते, संयम निर्माण करते आणि करुणाभाव जागृत करते. जर आपण  डिसेंब३१र हा दिवस द्वेष, तणाव आणि अस्वस्थतेचा शेवट करून शांतता, सहिष्णुता, करुणा आणि मानवी मूल्यांचा नव्या वर्षाचा आरंभ म्हणून साजरा केला, तरच जागतिक शांतता ध्यान दिवसाचा खरी अर्थपूर्ण साजरा होईल.


डॉ. राजेंद्र बगाटे (लेखक, समाजशास्त्राचे अभ्यासक आहेत)

Previous Post

गौतम गंभीरच भारताचा कसोटी प्रशिक्षक म्हणू्न कायम

Next Post

धक्कादायक! भांडुपमध्ये अचानक बसचा वेग वाढल्याने चौघांचा मृत्यू तर १३ जण जखमी, बसचालकाला अटक

admin

admin

Next Post
धक्कादायक! भांडुपमध्ये अचानक बसचा वेग वाढल्याने चौघांचा मृत्यू तर १३ जण जखमी, बसचालकाला अटक

धक्कादायक! भांडुपमध्ये अचानक बसचा वेग वाढल्याने चौघांचा मृत्यू तर १३ जण जखमी, बसचालकाला अटक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (42)
  • अहिल्यानगर (13)
  • कृषी (28)
  • कोकण (38)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,011)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (420)
  • नवी मुंबई (188)
  • नागपूर (83)
  • नाशिक (59)
  • पालघर (56)
  • पालघर (43)
  • पुणे (875)
  • पुणे जिल्हा (182)
  • महाराष्ट्र (1,061)
  • मुंबई (2,877)
  • रत्नागिरी (34)
  • राजकीय (214)
  • रायगड (34)
  • राष्ट्रीय (335)
  • वसई-विरार (2)
  • विशेष लेख (610)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (17)
  • स्पोर्ट्स (179)

Follow Us

Recent News

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

चित्रपट निर्मात्यांना CBFC चा दणका! आता चित्रपटांना Subtitles आणि Audio Description बंधनकारक

March 14, 2026
युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

युद्धाचे सावट! रेशन टंचाई टाळण्यासाठी सरकारचे मोठे पाऊल; राज्यातील रेशनधारकांना जून २०२६ पर्यंतचे रेशन ‘अॅडव्हान्स’मध्ये!

March 14, 2026
गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

गॅस टंचाईचा साई प्रसादाला फटका! भाविकांना आता मिळणार प्रति व्यक्ती एकच लाडू

March 14, 2026
“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

“मासिक पाळीची रजा ठरेल महिलांच्या रोजगारावर गदा!” – सर्वोच्च न्यायालयाची टिप्पणी

March 14, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION