• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र कला दालन उभारणार; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा

admin by admin
October 30, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईत व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र कला दालन उभारणार; ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ पुस्तक प्रकाशन सोहळ्यात मुख्यमंत्र्यांची घोषणा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्यातील व्यंगचित्रकलेला नवे व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मुंबईत व्यंगचित्रकारांच्या कलेचे स्वतंत्र दालन उभारण्यात येणार असल्याची महत्त्वपूर्ण घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली. सांस्कृतिक कार्य विभागाच्या माध्यमातून हे दालन उभारण्यासाठी शासन पुढाकार घेणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक सभागृहात व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी संपादित आणि ग्रंथाली प्रकाशनतर्फे प्रकाशित ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या पुस्तकाच्या प्रकाशन सोहळ्यात ते बोलत होते. यावेळी सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मनसे अध्यक्ष राज ठाकरे, ग्रंथाली प्रकाशनचे विश्वस्त सुदेश हिंगलासपूरकर, संपादक प्रशांत कुलकर्णी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, व्यंगचित्रकला ही अत्यंत प्रभावी अभिव्यक्तीची कला असून एकही शब्द न वापरता समाजातील विसंगती, विरोधाभास आणि वास्तवावर नेमके भाष्य करण्याची ताकद या कलेत आहे. महाराष्ट्रातील व्यंगचित्रकारांनी विविध काळातील सामाजिक आणि राजकीय घडामोडींवर सातत्याने भाष्य करत ही समृद्ध परंपरा जपली आहे. व्यंगचित्रांच्या माध्यमातून व्यक्तिमत्त्वाचे दर्शन घडते आणि समाजमनाला विचार करायला भाग पाडणारी ही कला महाराष्ट्राच्या सांस्कृतिक वारशाचा महत्त्वाचा भाग असल्याचे त्यांनी नमूद केले. ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ हा ग्रंथ ही परंपरा भावी पिढीपर्यंत पोहोचविण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

यावेळी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्यंगचित्रकार म्हणून काम करताना आलेले अनुभव सांगताना व्यंगचित्रातील ‘रेषांमधला अर्थ’ समजून घेण्याचे महत्त्व अधोरेखित केले. समाजातील विसंगतींवर नेमके बोट ठेवण्याची ताकद व्यंगचित्रांमध्ये असून ही कला लोकशाहीला बळकटी देणारी असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच व्यंगचित्रकारांसाठी स्वतंत्र दालन उभारण्याच्या उपक्रमाला शासनाने सर्वतोपरी सहकार्य करावे, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी व्यंगचित्रातील रेषांचे महत्त्व, अचूक निरीक्षण आणि स्वाभिमान जपणाऱ्या कलेचे मूल्य अधोरेखित करत जुन्या व्यंगचित्रविश्वातील आठवणींना उजाळा दिला. महाराष्ट्रात कला आणि संस्कृतीच्या माध्यमातून एकत्र येण्याची परंपरा कायम असल्याचे त्यांनी नमूद केले. सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी ‘महाराष्ट्राच्या हास्यरेषा’ या ग्रंथाच्या निर्मितीसाठी प्रशांत कुलकर्णी आणि ग्रंथाली प्रकाशनाने घेतलेल्या परिश्रमांचे कौतुक केले. ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या नावाने पुणे विद्यापीठात अध्ययन केंद्र सुरू करण्याचे काम सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. कार्यक्रमाला राज्यातील अनेक व्यंगचित्रकार, कलावंत आणि कलाप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous Post

दिवाळीपूर्वी ‘लाडक्या बहिणीं’ना सुखद धक्का! सप्टेंबरचा १५०० रुपयांचा हप्ता मंजूर

Next Post

राज्यात मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुन्हा १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला!

admin

admin

Next Post
राज्यात मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुन्हा १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला!

राज्यात मतदार यादी पुनरीक्षणासाठी पुन्हा १३ नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ; अंतिम यादी ३० नोव्हेंबरला!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (66)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,147)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (503)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (89)
  • पालघर (77)
  • पालघर (51)
  • पुणे (1,075)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,216)
  • मुंबई (3,595)
  • रत्नागिरी (64)
  • राजकीय (284)
  • रायगड (64)
  • राष्ट्रीय (570)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (216)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION