मुंबई : शिवसेना ठाकरे गटाचे प्रवक्ते संजय राऊत यांनी काही सवाल करत बीआरएसच्या राजकीय भुमिकांवर संशय व्यक्त केला आहे.
माध्यमांशी बोलताना खा. संजय राऊत म्हणाले की अचानक महाराष्ट्रात पैशांचा ओघ कसा वळला? विठ्ठल भक्ती कशी अवतरली? हे सवाल करत संजय राऊत यांनी दावा केला आहे की महाराष्ट्रात मतांचे विभाजन करण्यासाठी बीआरएस आले आहे. बीआरएसकडे दुर्लक्ष करुन चालणार नाही. केसीआर यांच्या दौऱ्यामागे मोठे राजकीय कारस्थान आहे. एमआयएमने जे केले तेच बीआरएस करत आहेत. सगळे विरोधीपक्ष एकत्र आले असताना केसीआर आमच्यासोबत यायला हवे होते. पण ते आले नाहीत. ते भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत असा आरोप राऊत यांनी केला.
तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि भारत राष्ट्र समितीचे (बीआरएस) अध्यक्ष केसीआर म्हणजेच के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या पक्षाचा महाराष्ट्रात विस्तार करत आहेत. त्याच पार्श्वभूमीवर आषाढी वारीचे औचित्य साधून के. चंद्रशेखर राव हे त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळासह पंढरपूरला येत आहेत.
याबाबत संजय राऊत माध्यमांसमोर भाष्य केले. ते म्हणाले की केसीआर यांच्या दौऱ्यामागे मोठे राजकीय कारस्थान आहे. तसेच केसीआर भाजपला अप्रत्यक्षपणे मदत करत आहेत. असा दावा संजय राऊता यांनी केल्याने राजकीय वर्तुळात उलट सुलट चर्चा सुरु आहेत.





