मुंबई : जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करण्यात आले आहे. सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही. उद्योगधंदेवाढीसाठी काहीही नाही, असा दूरदृष्टीहीन अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली. दूरदृष्टीचा अभाव असलेला राज्याचा अर्थसंकल्प आहे. केवळ हा चुनावी जुमला आहे. जनतेच्या डोळ्यात धूळ फेकण्याचे काम करण्यात आले आहे. विकास निधीबाबत काहीही घोषणा करण्यात आलेली नाही.सरकारने पंचामृत मांडले, पण अमृत कोणी पाहिलेले नाही. उद्योगधंदेवाढीसाठी काहीही नाही, असा दूरदृष्टीहीन अर्थसंकल्प राज्य सरकारने सादर केला आहे, अशी टीका विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचा पहिला अर्थसंकल्प आज फडणवीस यांनी आज विधानसभेमध्ये सादर केला.
वास्तवाचे भान नसलेला अर्थसंकल्प आहे. स्वप्नांचे इमले रचले गेले आहेत आणि शब्दांचे फुलोरे अन् घोषणांचा सुकाळ असलेला हा अर्थसंकल्प आहे. सरकारने केवळ स्वप्न दाखवली आहेत. स्वप्नांच्या दुनियते फिरण्यासारखे आहे. अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांचे स्मारक कधी होईल, याबाबत स्पष्टता दाखविण्यात आलेली नाही. देहूसाठी भरीव तरतूद केलेली नाही. वास्तवाचे या सरकारला भान नाही. उद्योग धंद्यासाठी काहीही केलं नाही, अशी टीका अजित पवार यांनी यावेळी केली.





