• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

यंदा लहान मूर्तीसह साजरा करणार साधेपणाने गणेशोत्सव

admin by admin
September 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबईतील प्रसिद्ध भुलेश्वरचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने यंदाच्या ६३ व्या वर्षी एक महत्त्वपूर्ण आणि भावनिक निर्णय घेतला आहे. २२ ऑगस्ट रोजी बाप्पाच्या आगमन मिरवणुकीदरम्यान घडलेल्या भीषण दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर मंडळाने यंदा उंच आणि भव्य गणेशमूर्तीची परंपरा खंडित करण्याचा निर्णय घेतला आहे. या दुर्घटनेनंतर मंडळाच्या पदाधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेण्यात आली. बैठकीत सर्वानुमते यंदा केवळ विधिवत पूजेसाठी लहान गणेशमूर्तीची स्थापना करण्याचा निर्णय घेण्यात आला. ही पूजेची मूर्ती नेहमीप्रमाणे ११ दिवस मंडपात विराजमान राहणार असून तिचे आगमन आणि विसर्जनही अत्यंत साध्या आणि शांत वातावरणात पार पडणार आहे. मंडळाने यावर्षी कोणतीही भव्य मिरवणूक किंवा उंच मूर्ती न आणता उत्सव श्रद्धा, शिस्त आणि सुरक्षिततेला प्राधान्य देत साजरा करण्याचे ठरवले आहे. या निर्णयामुळे गणेशभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असली तरी मानवी जीविताला सर्वोच्च प्राधान्य देत मंडळाने घेतलेल्या भूमिकेचे अनेक स्तरांतून स्वागत केले जात आहे. दरम्यान, २२ ऑगस्ट रोजी घडलेल्या दुर्घटनेत मंडळाने यंदासाठी साकारलेली २२ फूट उंच आकर्षक गणेशमूर्ती भायखळ्यातून मिरवणुकीसह भुलेश्वरकडे आणली जात होती. मुख्य मंडपापासून अवघ्या ५० ते ६० मीटर अंतरावर असताना अचानक मूर्तीचा तोल गेला आणि ती कोसळली. या भीषण अपघातात मंडळाचे ३३ वर्षीय अध्यक्ष संकेत नेवशे आणि ३० वर्षीय पदाधिकारी ब्रिजेश हेमंत जोशी यांचा जागीच मृत्यू झाला. तसेच ५ आणि ७ वर्षांच्या दोन चिमुरड्यांसह एकूण पाच जण जखमी झाले. या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली होती.

या प्रकरणाचा तपास एल. टी. मार्ग पोलीस करत असून अपघातामागील कारणांचा सखोल शोध सुरू आहे. तपासादरम्यान मूर्तिकार अनिकेत देसाई यांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, कारखान्यातून मूर्ती बाहेर काढल्यानंतर अवघ्या १५० मीटर अंतरावर तिच्या पाठीमागील लोखंडी सांगाड्याचे वेल्डिंग तुटल्याचे लक्षात आले होते. त्यानंतर मूर्ती पुन्हा कारखान्यात नेऊन घाईघाईने वेल्डिंगचे काम करण्यात आले आणि त्यानंतर मिरवणूक पुन्हा सुरू करण्यात आली. मात्र, पोलिसांच्या प्राथमिक तपासात लोखंडी सांगाड्याचे वेल्डिंग कमकुवत असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. याच कारणामुळे पुढे मिरवणुकीदरम्यान वेल्डिंग तुटून मूर्तीचा तोल गेला आणि ही मोठी दुर्घटना घडल्याचे प्राथमिक निष्कर्षातून समोर आले आहे. या घटनेनंतर सार्वजनिक गणेशोत्सवांमध्ये उभारल्या जाणाऱ्या महाकाय मूर्तींची सुरक्षितता, त्यांच्या लोखंडी सांगाड्यांची गुणवत्ता, वेल्डिंगची तपासणी आणि मिरवणुकीदरम्यान आवश्यक सुरक्षाव्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी अधिक कडक सुरक्षा निकष लागू करण्याची मागणीही आता जोर धरू लागली आहे. दरम्यान, भुलेश्वरचा राजा मंडळाने घेतलेला साधेपणाचा निर्णय हा केवळ परंपरेत बदल नसून दुर्घटनेत गमावलेल्या सहकाऱ्यांना वाहिलेली भावपूर्ण श्रद्धांजली मानली जात आहे.

Previous Post

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

admin

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (47)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (33)
  • कोकण (56)
  • कोल्हापूर (31)
  • कोल्हापूर जिल्हा (10)
  • गुन्हेगारी (1,111)
  • गॅलरी (5)
  • जालना (8)
  • ठाणे (485)
  • नवी मुंबई (209)
  • नागपूर (107)
  • नाशिक (82)
  • पालघर (73)
  • पालघर (47)
  • पुणे (1,037)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,919)
  • मुंबई (3,422)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (275)
  • रायगड (60)
  • राष्ट्रीय (516)
  • वसई-विरार (59)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

भुलेश्वरचा राजा : ६३ वर्षांत पहिल्यांदाच खंडित होणार उंच मूर्तीची परंपरा!

September 2, 2026
सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सुट्टे खाद्यतेल विक्रीवरील कारवाईला १ वर्षाची मुदतवाढ – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

September 2, 2026
“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

“परदेश प्रवास टाळा, गरज नसल्यास सोने खरेदी करू नका”; पंतप्रधान मोदींचे आवाहन

September 1, 2026
सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

सांस्कृतिक पद्धतीने गणेशोत्सव साजरा करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन

August 31, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION