• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

admin by admin
August 12, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अंधेरी पश्चिम–मंडाले मेट्रो २ ब मार्गिकेतील बहुप्रतीक्षित चेंबूर मेट्रो स्थानक आणि वाकोला–वांद्रे-कुर्ला संकुल (बीकेसी) उन्नत मार्ग अखेर गुरुवार, १३ ऑगस्ट रोजी प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार आहेत. या दोन्ही महत्त्वाच्या प्रकल्पांचे लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) यासाठी सर्व तयारी पूर्ण केली आहे. या लोकार्पणामुळे पूर्व उपनगरातील सार्वजनिक वाहतूक आणि रस्ते वाहतूक व्यवस्थेला मोठा दिलासा मिळणार आहे. चेंबूर मेट्रो स्थानक सुरू झाल्यानंतर प्रवाशांना मंडाले ते चेंबूर असा अखंड मेट्रो प्रवास करता येणार आहे, तर वाकोला–बीकेसी उन्नत मार्ग सुरू झाल्याने वाकोला ते बीकेसी हे अंतर अवघ्या ५ ते १० मिनिटांत पार करता येणार आहे. मेट्रो २ ब मार्गिकेतील मंडाले–डायमंड गार्डन हा ५.६ किलोमीटरचा टप्पा यापूर्वी एप्रिल महिन्यात सुरू करण्यात आला होता. मात्र, त्या टप्प्याला अपेक्षित प्रवासी प्रतिसाद मिळत नसल्याने एमएमआरडीएने तिसऱ्या टप्प्यातील एकमेव चेंबूर मेट्रो स्थानक लवकरात लवकर सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार स्थानकाचे सर्व बांधकाम पूर्ण करण्यात आले तसेच संचालनासाठी आवश्यक असलेले सुरक्षा प्रमाणपत्र देखील मे महिन्याच्या अखेरीस प्राप्त झाले होते. त्यामुळे जूनमध्येच हे स्थानक सुरू होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र, लोकार्पणासाठी योग्य वेळ न मिळाल्याने जवळपास अडीच महिने हे स्थानक सुरू होऊ शकले नव्हते. अखेर आता या प्रतीक्षेला पूर्णविराम मिळाला असून, गुरुवारी अधिकृत लोकार्पणानंतर प्रवाशांसाठी हे स्थानक खुले करण्यात येणार आहे. चेंबूर मेट्रो स्थानकामुळे परिसरातील नागरिकांना जलद, सुरक्षित आणि आधुनिक प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. याशिवाय या स्थानकाला व्ही. एन. पुरव मार्ग आणि आर. सी. मार्ग जंक्शन येथील मोनोरेल स्थानकाशी पादचारी पुलाद्वारे जोडण्यात येणार आहे. हा पूल कार्यान्वित झाल्यानंतर मेट्रो आणि मोनोरेल यांच्यातील प्रवास अधिक सुलभ होईल. त्यामुळे प्रवाशांना एका वाहतूक व्यवस्थेतून दुसऱ्या व्यवस्थेत सहज बदल करता येईल आणि सार्वजनिक वाहतुकीचे जाळे अधिक सक्षम होण्यास मदत मिळेल.

याच कार्यक्रमात वाकोला–बीकेसी उन्नत मार्गाचे देखील लोकार्पण करण्यात येणार आहे. सांताक्रूझ–चेंबूर लिंक रोड (एससीएलआर) विस्तारीकरण प्रकल्पा अंतर्गत एमएमआरडीएने उभारलेल्या तीन उन्नत मार्गांपैकी दोन मार्ग यापूर्वीच सुरू झाले आहेत. मात्र, १.२ किलोमीटर लांबीचा वाकोला–बीकेसी उन्नत मार्ग सुरू होण्याची प्रतीक्षा वाहनचालकांना होती. गुरुवारपासून हा मार्ग वाहतुकीसाठी खुला झाल्यानंतर वाकोला आणि बीकेसीदरम्यानचा प्रवास मोठ्या प्रमाणात वेगवान होणार असून, वाहतूक कोंडीतून मोठा दिलासा मिळण्याची अपेक्षा आहे. विशेषतः बीकेसीमध्ये कामासाठी येणाऱ्या हजारो नोकरदार, व्यावसायिक आणि प्रवाशांचा वेळ वाचणार असून, इंधनाची बचत आणि प्रदूषणातही घट होण्यास मदत होईल. या दोन महत्त्वाच्या प्रकल्पांसोबतच ठाणे–बोरिवली दुहेरी बोगदा प्रकल्पालाही गुरुवारी गती मिळणार आहे. या प्रकल्पाअंतर्गत ठाण्यातील लॉन्चिंग शाफ्टमध्ये ‘अर्जुना’ नावाचे टनेल बोअरिंग मशीन (टीबीएम) मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते भूगर्भात सोडण्यात येणार आहे. या मशीनच्या साहाय्याने दुसऱ्या बोगद्याच्या खोदकामाला सुरुवात होणार असून, ठाणे ते बोरिवलीदरम्यानचा महत्त्वाकांक्षी बोगदा प्रकल्प पुढील टप्प्यात प्रवेश करणार आहे. मुंबई महानगर प्रदेशातील वाढती लोकसंख्या, वाहतुकीवरील ताण आणि जलद प्रवासाची गरज लक्षात घेता मेट्रो, उन्नत मार्ग आणि बोगदा प्रकल्प यांसारख्या पायाभूत सुविधांना विशेष महत्त्व दिले जात आहे. चेंबूर मेट्रो स्थानक सुरू झाल्याने मेट्रो २ ब मार्गिकेचा उपयोग वाढण्याची अपेक्षा असून, वाकोला–बीकेसी उन्नत मार्गामुळे पश्चिम आणि पूर्व उपनगरांतील वाहतूक अधिक सुरळीत होणार आहे. तसेच ठाणे–बोरिवली बोगदा प्रकल्पाच्या कामालाही गती मिळाल्याने भविष्यात मुंबई महानगर प्रदेशातील प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि वेळेची बचत करणारा ठरणार आहे. त्यामुळे गुरुवारचा दिवस मुंबईच्या वाहतूक व्यवस्थेसाठी महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

Previous Post

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

Next Post

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

admin

admin

Next Post
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,105)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,823)
  • मुंबई (3,365)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (57)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (54)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

गटारी अमावस्येपूर्वीच मटण प्रेमींना महागाईची फोडणी; किलोचा दर थेट हजाराच्या उंबरठ्यावर!

August 12, 2026
वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

वसईत बनावट नोटांचा मोठा पर्दाफाश; १ कोटींच्या बनावट नोटा जप्त!

August 12, 2026
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION