• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

admin by admin
August 12, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : सांताक्रूझ पूर्व भागातील पश्चिम द्रुतगती महामार्गालगतच्या सेवा रस्त्यावर तसेच आग्रीपाडा परिसरातील वाढत्या अनधिकृत अतिक्रमणांविरोधात मुंबई महापालिकेच्या एच-पूर्व विभागाने ८ ऑगस्ट रोजी मोठी संयुक्त कारवाई राबवली. महापालिका आयुक्त आश्विनी भिडे यांच्या आदेशानुसार आणि उपायुक्तांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सहायक आयुक्त मृदुला अंडे यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. या कारवाईत अतिक्रमण विभाग, परवाना विभाग तसेच संबंधित विभागांतील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला. चक्की खान जंक्शन ते आग्रीपाडा परिसरादरम्यान पश्चिम द्रुतगती महामार्गाच्या सेवा रस्त्यावर उभारण्यात आलेल्या अनधिकृत झोपड्या, तात्पुरती बांधकामे आणि फेरीवाल्यांच्या अतिक्रमणांवर कठोर कारवाई करण्यात आली. या मोहिमेदरम्यान पाच अनधिकृत झोपड्या आणि इतर संरचना जमीनदोस्त करण्यात आल्या, तर सात फेरीवाल्यांचे साहित्य जप्त करण्यात आले. रस्त्यालगत पडून असलेले लाकडी बाक, फळ्या आणि इतर अनधिकृत साहित्य हटविण्यात आले. आग्रीपाडा परिसरात दहा ठिकाणी ठेवण्यात आलेले लाकडी साहित्य जेसीबीच्या साहाय्याने घटनास्थळीच तोडून नष्ट करण्यात आले. या कारवाईमुळे सेवा रस्त्यावर निर्माण झालेले अडथळे दूर झाले असून वाहतुकीसाठी रस्ता अधिक मोकळा करण्यात आला आहे. मात्र, अतिक्रमण हटविल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण होऊ नये, यासाठी नियमित पाहणी आणि सातत्यपूर्ण कारवाई आवश्यक असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे. याचबरोबर सेवा रस्त्यावर होणाऱ्या अनधिकृत पार्किंगमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असल्याने वाहतूक पोलिसांनीही या समस्येकडे लक्ष देऊन कठोर नियंत्रण ठेवावे, अशा सूचनाही करण्यात आल्या आहेत. अतिक्रमण आणि बेकायदा पार्किंग या दोन्ही समस्यांवर समन्वयाने कारवाई झाल्यास सेवा रस्ता अधिक सुरक्षित, मोकळा आणि सुरळीत वाहतुकीसाठी उपयुक्त ठरेल, असे सहायक आयुक्त मृदुला अंडे यांनी सांगितले. महापालिकेच्या मते, नागरिकांच्या सुरक्षिततेसह रस्त्यांची क्षमता कायम राखण्यासाठी अशा कारवाया सातत्याने सुरू राहणार आहेत.

याच मोहिमेअंतर्गत एच-पूर्व विभागाने पश्चिम द्रुतगती महामार्ग परिसर, राम मंदिर रोड आणि खेरवाडी येथील मेंटेनन्स चौकी परिसरात बेकायदा लावण्यात आलेले बॅनर हटविण्याची कारवाईही केली. मेंटेनन्स विभागाच्या सहकार्याने संयुक्त पथकाने सार्वजनिक ठिकाणांवरील अनधिकृत जाहिराती काढून परिसर स्वच्छ करण्यात आला. गोळीबार रोड परिसरात अग्निशमन विभाग आणि आरोग्य विभागाच्या संयुक्त पथकाने दोन हॉटेल्सची तपासणी करून आवश्यक ती कारवाई केली, तर डावरी नगर परिसरातील एका हॉटेलवरही संयुक्त मोहीम राबविण्यात आली. या तपासणीत संबंधित आस्थापनांकडून अग्निसुरक्षा, आरोग्यविषयक नियम आणि इतर आवश्यक कायदेशीर अटींचे पालन होत आहे की नाही, याची सखोल पडताळणी करण्यात आली. त्याचप्रमाणे ७ ऑगस्ट रोजी सांताक्रूझ रेल्वे स्थानक परिसरात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी महापालिकेचे पथक पोलिसांसोबत तैनात करण्यात आले होते. यापूर्वी ६ ऑगस्ट रोजी राम मंदिर रोड परिसरात चार ठिकाणी अतिक्रमण हटविण्याची कारवाई करण्यात आली होती. तसेच वांद्रे पूर्व येथील अल सना बिल्डिंग कंपाऊंड परिसरात दोन ठिकाणी कारवाई करून अनधिकृत बांधकामे हटविण्यात आली. पश्चिम द्रुतगती महामार्गालगत लावण्यात आलेले बेकायदा बॅनरही हटविण्यात आले. एअरपोर्ट कॉलनी परिसरात वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सहकार्याने एका आस्थापनावर संयुक्त तपासणी करण्यात आली. महापालिकेच्या विविध विभागांकडून बेकायदा अतिक्रमणे, अनधिकृत जाहिराती, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या व्यावसायिक आस्थापनांवर आणि सार्वजनिक जागांचा गैरवापर करणाऱ्यांविरोधात सातत्याने कारवाया सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. शहरातील रस्ते, पदपथ आणि सार्वजनिक जागा नागरिकांसाठी सुरक्षित, स्वच्छ आणि अडथळामुक्त ठेवणे हे या मोहिमेचे प्रमुख उद्दिष्ट असून, सर्व नागरिकांनी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे.

Previous Post

प्रवाशांच्या तक्रारींनंतर सिल्लोड एसटी कँटीनला ‘FDA’ चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी कँटीनचे लायसन्स रद्द!

Next Post

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

admin

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
प्रवाशांच्या तक्रारींनंतर सिल्लोड एसटी कँटीनला ‘FDA’ चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी कँटीनचे लायसन्स रद्द!

प्रवाशांच्या तक्रारींनंतर सिल्लोड एसटी कँटीनला ‘FDA’ चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी कँटीनचे लायसन्स रद्द!

August 12, 2026
घाटकोपरमध्ये पहाटे भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ९ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू!

घाटकोपरमध्ये पहाटे भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ९ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू!

August 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (46)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (55)
  • कोल्हापूर (30)
  • कोल्हापूर जिल्हा (9)
  • गुन्हेगारी (1,104)
  • गॅलरी (5)
  • जालना (4)
  • ठाणे (480)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (102)
  • नाशिक (77)
  • पालघर (72)
  • पालघर (47)
  • पुणे (1,026)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,823)
  • मुंबई (3,365)
  • रत्नागिरी (51)
  • राजकीय (272)
  • रायगड (56)
  • राष्ट्रीय (500)
  • वसई-विरार (53)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

स्वातंत्र्यदिनापूर्वी मुंबईकरांना वाहतूक कोंडीतून दिलासा; चेंबूर मेट्रो आणि वाकोला-बीकेसी फ्लायओव्हरचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

August 12, 2026
सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

सांताक्रूझ नेहरू रोडवरील अतिक्रमणांवर पालिकेचा हातोडा; पदपथ अखेर मुक्त!

August 12, 2026
प्रवाशांच्या तक्रारींनंतर सिल्लोड एसटी कँटीनला ‘FDA’ चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी कँटीनचे लायसन्स रद्द!

प्रवाशांच्या तक्रारींनंतर सिल्लोड एसटी कँटीनला ‘FDA’ चा दणका; अस्वच्छतेप्रकरणी कँटीनचे लायसन्स रद्द!

August 12, 2026
घाटकोपरमध्ये पहाटे भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ९ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू!

घाटकोपरमध्ये पहाटे भीषण दुर्घटना; ६ जणांचा मृत्यू, ९ तासानंतरही रेस्क्यू ऑपरेशन सुरू!

August 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION