• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home गुन्हेगारी

वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!

admin by admin
June 17, 2026
in गुन्हेगारी, महाराष्ट्र, मुंबई
0
वर्तमानपत्रात खाद्यपदार्थ देणाऱ्या २६ हॉटेल-दुकानदारांवर एफडीएची कारवाई; तुकाराम मुंढेंचा मोठा दणका!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : अन्नपदार्थ पॅकिंग करण्यासाठी किंवा थेट संपर्कात येईल अशा प्रकारे वर्तमानपत्राचा वापर करणाऱ्या अन्न व्यावसायिकांविरुद्ध महाराष्ट्र अन्न व औषध प्रशासनाने (एफडीए) कठोर कारवाई सुरू केली आहे. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अन्न सुरक्षेला प्राधान्य देत वर्तमानपत्रात वडापाव, भजी, समोसा आणि इतर खाद्यपदार्थ देण्याच्या प्रथेविरोधात विशेष मोहीम हाती घेण्याचे निर्देश दिले आहेत. या पार्श्वभूमीवर मुंबई विभागात ५ ते १६ जून या कालावधीत विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान ५५ अन्न व्यवसाय आस्थापनांची तपासणी करण्यात आली. तपासणीमध्ये २६ आस्थापनांमध्ये अन्नपदार्थ पॅकिंग किंवा विक्रीसाठी वर्तमानपत्राचा वापर होत असल्याचे आढळून आले. त्यापैकी १७ प्रकरणे निकाली काढण्यात आली असून अन्न सुरक्षा व मानके अधिनियमांतर्गत संबंधितांवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईतून एकूण १ लाख ५१ हजार रुपयांचा तडजोड दंड वसूल करण्यात आला आहे. उर्वरित प्रकरणांमध्ये पुढील कार्यवाही सुरू असल्याची माहिती एफडीएने दिली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अन्न सुरक्षेच्या बाबतीत ‘झिरो टॉलरन्स’ धोरण स्वीकारले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर यापुढे अधिक कठोर कारवाई केली जाईल, असा स्पष्ट इशारा दिला आहे. अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरणाने (FSSAI) यापूर्वीच वर्तमानपत्राचा अन्नपदार्थांच्या पॅकिंगसाठी वापर करण्यास मनाई केली असून त्याबाबत अन्न व औषध प्रशासनाने वेळोवेळी सूचना दिल्या होत्या. तरीही काही विक्रेते या नियमांचे पालन करत नसल्याचे तपासणीत आढळून आल्याने ही मोहीम राबविण्यात आली.

अन्न तज्ज्ञांच्या मते वर्तमानपत्राच्या छपाईसाठी वापरण्यात येणाऱ्या शाईमध्ये शिसे, कॅडमियम, झिंक यांसारख्या घातक धातूंसह विविध रासायनिक घटकांचा समावेश असतो. गरम अथवा तेलकट अन्नपदार्थ वर्तमानपत्रावर ठेवल्यास किंवा त्यात गुंडाळल्यास हे रासायनिक घटक अन्नामध्ये मिसळण्याची शक्यता असते. परिणामी ते मानवी शरीरात जाऊन दीर्घकालीन आरोग्यविषयक समस्या निर्माण करू शकतात. तज्ज्ञांच्या मते अशा रसायनांचा सातत्याने संपर्क आल्यास यकृताचे विकार, पचनसंस्थेचे आजार तसेच गंभीर आरोग्यधोके निर्माण होऊ शकतात. याशिवाय वर्तमानपत्रांचे वितरण आणि हाताळणी अनेक स्तरांवर होत असल्याने त्यावर विविध प्रकारचे जंतू, धूळ आणि प्रदूषक साचलेले असू शकतात. त्यामुळे ते रोगजंतूंचे वाहक बनण्याचीही शक्यता नाकारता येत नाही. या सर्व बाबी लक्षात घेऊन एफडीएने सर्व हॉटेल्स, मिठाई दुकाने, खाद्यपदार्थ विक्रेते आणि रस्त्यावरील फूड स्टॉल चालकांना वर्तमानपत्राचा वापर तात्काळ बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. त्याऐवजी बटर पेपर, अॅल्युमिनियम किंवा सिल्व्हर फॉइल तसेच फूड ग्रेड पॅकेजिंग साहित्याचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. आयुक्त तुकाराम मुंढे आणि सहआयुक्त (अन्न) महेश चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली असून भविष्यात अशा प्रकारच्या तपासण्या नियमितपणे सुरू राहणार आहेत. ग्राहकांच्या आरोग्याशी कोणतीही तडजोड केली जाणार नसून अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा पुनरुच्चार एफडीएने केला आहे.

Previous Post

खड्डा दिसला की लगेच करा तक्रार; महापालिकेकडून विशेष ॲपची निर्मिती!

Next Post

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

admin

admin

Next Post
वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

वसईत शिधावाटप धान्याचा काळाबाजार उघड; ११०० किलो धान्यसाठा जप्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

June 19, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (50)
  • कोल्हापूर (27)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,060)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (456)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (70)
  • पालघर (63)
  • पालघर (43)
  • पुणे (965)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,474)
  • मुंबई (3,143)
  • रत्नागिरी (45)
  • राजकीय (252)
  • रायगड (40)
  • राष्ट्रीय (434)
  • वसई-विरार (28)
  • विशेष लेख (622)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (199)

Follow Us

Recent News

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

उकाड्यापासून बचावासाठी मुंबईकरांचा समुद्रकिनाऱ्याकडे ओढा; रात्री वर्सोवा किनाऱ्यावर झोपणाऱ्यांची गर्दी!

June 19, 2026
“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

“२९ ऑगस्टपर्यंत मागण्या पूर्ण करा, अन्यथा शेवटचे आमरण उपोषण!” – मनोज जरांगे पाटलांचा सरकारला अंतिम इशारा

June 19, 2026
पाड रे पानी!

पाड रे पानी!

June 19, 2026
चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

चौथीच्या इतिहास पुस्तकात शिवचरित्राला विशेष स्थान; बालभारतीकडून विद्यार्थ्यांना प्रेरणादायी वारशाची ओळख!

June 19, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION