मुंबई : राज्य सरकारच्या अंतर्गत येत असलेल्या भायखळा स्थित सर १८० व्या वर्धापनदिनानिमित्त नवीन टप्पे गाठत आहे. या संदर्भात, रुग्णालयाच्या ऑर्थोपेडिक विभागाने अन्य सरकारी रुग्णालयांमधील ऑर्थोपेडिक सर्जन आणि वैद्यकीय विद्यार्थ्यांना ऑर्थोपेडिक शस्त्रक्रियेतील नावीन्यपूर्ण तंत्रं शिकविण्यात येणार आहेत. याअंतर्गत, रुग्णालयात हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रियेशी संबंधित आधुनिक तंत्रांवर दोन दिवसांची कार्यशाळा आयोजित करण्यात आली आहे.
या कार्यशाळेत अमेरिकेतील डॉक्टर आधुनिक तंत्रांचा वापर करून थेट हिप रिप्लेसमेंट शस्त्रक्रिया करणार आहेत. केवळ जेजे हॉस्पिटलच नाही तर राज्यातील अन्य १५ सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांचे सर्जन या थेट शस्त्रक्रियेच्या मदतीने शस्त्रक्रियेच्या आधुनिक तंत्रे शिकणार आहेत. पुढील पिढीतील डॉक्टरांना याचा अधिक फायदा मिळणार असल्याचे दिसून येत आहे. वैद्यकीय युगात नवीन तंत्रं उदयास येत आहेत. हीच तंत्र गुंतागुंतीशिवाय शस्त्रक्रिया सुलभ करत आहे. डॉक्टरांना शस्त्रक्रियेच्या या आधुनिक तंत्रांचे ज्ञान देण्यासाठी जेजे हॉस्पिटलच्या ऑर्थोपेडिक विभागाने पुढाकार घेतला आहे. याअंतर्गत, जेजे रुग्णालयाचे डीन डॉ. अजय भंडारवार यांच्या मार्गदर्शनाखाली, रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. संजय सुरासे आणि ऑर्थोपेडिक विभागाचे प्रमुख डॉ. नादिर शाह यांच्या नेतृत्वाखाली २१ आणि २२ जुलै रोजी विशेष कार्यशाळा आयोजित करण्यात आल्या आहेत. आधुनिक तंत्रांनी हिप रिप्लेसमेंट सर्जरी कशी करावी यासाठी यूएसचे डॉकटर धडे देणार असल्याचे सांगण्यात येत आहे.





