पुणे : राज्यात आत्महत्येचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून आत्महत्या केल्याचा अनेक घटना उघडकीस ये असतात. अशातचं आता पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पती तसेच सासू-सासरे व इतर नातेवाईक यांच्या सततच्या जाचाला कंटाळून नवविवाहितेने गळफासवून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. राहत्या घरात तिने गळफास लावून आपले जीवन संपवले आहे.
याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. मोहिनी आकाश करनुरे (वय २१, रा. देवाची ऊरळी, ता. हवेली) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. याप्रकरणी मोहिनी हिचे वडिल ज्ञानेश्वर माशाळे (वय ४६, रा. उमरगा, जि. धाराशिव) यांनी फुरसुंगी पोलिसांत तक्रार दिली आहे. यानूसार पोलिसांनी पती आकाश विलास करनुरे, सासरे विलास नारायण करनुरे व सासू शोभा विलास करनुरे यांना अटक केली आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, मोहिनी व आकाश यांचा गेल्या वर्षी (ऑगस्ट २०२४) मध्ये विवाह झाला आहे. विवाहानंतर मोहिनी ही पती व सासू-सासऱ्यांसोबत देवाची ऊरळी येथील ओसवाल मळा येथे राहत होती. दरम्यान, पती, सासू-सासरे आणि इतर नातेवाईकांनी तिला माहेरहून पैसे आणण्यासाठी तगादा लावला होता. तसेच, तिला टोचून बोलत तिचा शारिरीक व मानसिक छळ केला. या सततच्या छळाला कंटाळून मोहिनी हिने राहत्या घरात गळफास लावून आत्महत्या केली. अत्यंसंस्कार केल्यानंतर वडिलांनी पोलिसांत तक्रार दिली. त्यानंतर गुन्हा नोंद करून तिघांना अटक केली आहे. अधिक तपास पोलीस करत आहेत.







