• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

‘यंग इंडिया अनच्नेड’ उपक्रमातून महिलांविषयक गुन्हेगारीला बसेल प्रतिबंध – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 5, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षित वातावरणात आपला विकास करता आला पाहिजे. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटनांना प्रतिबंध करण्यासाठी समाज प्रबोधन देखील काळाची गरज आहे. महिलांविषयक गुन्हेगारीला, तस्करीला आळा घालण्यासाठी राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम संपूर्ण मुंबईतील ३० विविध महाविद्यालयात सुरू होणार आहे, या उपक्रमाची महानगरपालिका, जिल्हा आणि तालुकास्तरावर व्याप्ती वाढवावी, असे महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी सांगितले. सह्याद्री अतिथीगृह येथे राज्य महिला आयोग आणि अलायन्स अगेन्स्ट सेंटर ऑफ ट्रॅफिकिंग (ॲक्ट) यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘यंग इंडिया अनचेन्ड’ उपक्रमाच्या शुभारंभ कार्यक्रमात मंत्री कु. तटकरे बोलत होत्या. यावेळी या कार्यक्रमाला राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर, सदस्य सचिव श्रद्धा जोशी-शर्मा, उत्कर्षा रुपवते, सामाजिक संस्थेचे महेश ठाकरे यासह विविध संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मंत्री कु. तटकरे म्हणाल्या की, महिला व बालकांच्या बाबतीत घडणाऱ्या गुन्ह्यांबाबत जनजागृती करणे यासाठी हा उपक्रम महत्वाचा आहे. सुरक्षित वातावरणात प्रत्येकाला आपला विकास करता यावा यासाठी गुन्हा घडल्यास तरुणांनी त्याबाबत आवाज उठवावा, ‘यंग इंडिया अनच्नेड’ उपक्रमासाठी राज्य महिला आयोग त्यांच्यामागे खंबीर पणे उभे राहील. जेणेकरून एखादी तक्रार प्राप्त झाल्यानंतर ती तक्रार पोलीस स्थानकामध्ये दाखल करून न्याय मिळवून देण्यासाठी या माध्यमातून प्रयत्न करता येतील. महिला व बालकांवरील अत्याचाराच्या घटना होऊच नयेत यासाठी जनजागृती मोठ्या प्रमाणात होणे, यामध्ये प्रत्येक घटकाचा सहभाग महत्त्वाचा आहे. अशा घटना होऊ नये यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे ही आवश्यक बाब आहे. युवक – युवतींनी जनजागृती पर उपक्रमांमध्ये मोठ्या संख्येने सहभाग घेतल्यास अशा अनेक घटना रोखण्यासाठी मदत होऊ शकते, असेही मंत्री कु. तटकरे म्हणाल्या.

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष श्रीमती चाकणकर म्हणाल्या की, राज्य महिला आयोग महिलांच्या विविध प्रश्नांसाठी काम करत आहे. राज्य महिला आयोगाच्या मदतीने २४ मुलींची ओमान मधून सुटका करून त्यांना महाराष्ट्रात आणले आहे. महिलांनी अत्याचाराच्या घटनांविरुद्ध आवाज उठवला पाहिजे. अलीकडे सायबर क्राइमचे प्रमाण हे मोठ्या प्रमाणात वाढले आहे. सोशल मीडियावरून केले जाणारे ट्रोलिंग अथवा फसवणुकीच्या विरोधात तक्रार सायबर पोलिसांकडे जाऊन महिला तक्रार देऊ शकतात. संकट समयी मदतीसाठी महिलांना १०९१ हा टोल फ्री क्रमांक आहे. राज्य महिला आयोगाच्या पुढाकाराने ससून हॉस्पिटल येथे तृतीय पंथीयांसाठी स्वतंत्र वॉर्ड सुरू केले असून वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते या वॉर्डचे उद्घाटन करण्यात आले आहे. विधवा महिला, बालविवाह, हुंडा प्रथा अशा अनेक महिलांच्या प्रश्नांवर महिला आयोग काम करत आहे. राज्य महिला आयोगाचा ‘यंग इंडिया अनच्नेड’ हा उपक्रम सर्वांसाठी एक सुरक्षित समाज निर्माण करण्यासाठी मदत करेल, असेही त्या म्हणाल्या. राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचे माजी महासंचालक डॉ. पी. एम. नायर यांनी मार्गदर्शन केले. राज्य महिला आयोगाच्या सदस्य सचिव श्रीमती जोशी-शर्मा यांनी आयोग मार्फत राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती यावेळी दिली. ‘यंग इंडिया अनचेन्ड’ नागपूरचे सदस्य यशदा कटारिया व अमरधाम कुटे यांनी मनोगत व्यक्त केले. अलायन्स अगेन्स्ट सेंटर्स ऑफ ट्रॅफिकिंग (ॲक्ट) या अंतर्गत प्रकृती ट्रस्ट, युवा रुरल असोसिएशन, प्रथम, विप्ला फाउंडेशन अशा विविध संस्थांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते. विविध महाविद्यालयांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

Previous Post

चटकदार पदार्थ विकणाऱ्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; FDAकडून धक्कादायक खुलासा

Next Post

तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

तैवानबरोबर तंत्रज्ञान तसेच उद्योग क्षेत्रात सहकार्य वाढविणार – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION