• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

रस्त्यावर फुलांचा कचरा टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा

दादरमधील मीनाताई ठाकरे फुल मंडईसाठी १ कॉम्‍पॅक्‍टर कायमस्‍वरूपी तैनात करणार

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
October 5, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : प्रभादेवी, दादर परिसरात फुलांचा कचरा रस्त्यावरच टाकणाऱ्या व्यापाऱ्यांना आळा घालण्यासाठी मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍याने येथे कायमस्‍वरूपी एक कचरा संकलन व वाहतूक करणारे वाहन (कॉम्‍पॅक्‍टर) तैनात केले आहे. कचरा अस्‍ताव्‍यस्‍तपणे टाकणाऱ्या फुल विक्रेत्यांवर यापुढे दंडात्मक कारवाई करण्याचा इशारा पालिका प्रशासनाने दिला आहे. प्रभादेवी, दादर रेल्‍वे स्‍थानकाबाहेरील मीनाताई ठाकरे फुल मंडई परिसरामध्ये अनेक व्‍यापारी, व्‍यावसायिक रस्‍त्‍यावरच कचरा टाकतात. याला प्रतिबंध करण्यासाठी बुधवारी घनकचरा विभागात मंडईतील व्‍यापारी, व्‍यावसायिकांची बैठक घेऊन स्‍वच्‍छ मुंबई, सुंदर मुंबई’ संदर्भात जनजागृती करण्यात आली. महापालिकेने संपूर्ण मुंबईत स्‍वच्‍छता मोहीम हाती घेतली आहे. विविध ठिकाणी कचरा वर्गीकरणाबाबत महानगरपालिकेच्या वतीने जनजागृती केली जात आहे. मात्र काही ठिकाणी रस्‍त्‍यावरच कचरा टाकत असल्‍याच्‍या नागरिकांच्‍या तक्रारी पालिकेकडे येत असतात. त्‍यात मीनाताई ठाकरे फुल मंडईबाहेर दररोज फुलांचा ढीग टाकला जात असल्‍याच्‍या तक्रारीचादेखील समावेश आहे.

या पार्श्‍वभूमीवर जी उत्‍तर विभागातील घनकचरा व्‍यवस्‍थापन खात्‍याच्‍या अधिका-यांनी मीनाताई ठाकरे फुल मंडईतील व्‍यापारी, व्‍यावसायिक यांची नुकतीच बैठक घेतली. या परिसरात कचरा संकलन आणि वाहतुकीसाठी १ वाहन येथे सतत उभे असते. तरी देखील मंडईतील अनेक व्‍यावसायिक कचरा रस्त्यावर टाकतात. त्यामुळे विनाकारण महानगरपालिकेस नागरिकांच्या रोषाला सामोरे जावे लागते, अशी माहिती पालिका अधिकाऱ्यांनी दिली. मुंबई महानगरपालिकेने निवासी संकूल, घाऊक कचरा उत्पादक यांना स्वतःचा कचरा स्वतः विघटन करण्याबाबतचे निर्देश दिले आहेत. त्याच पद्धतीने फुल मंडईतील कच-याचे जागीच विघटन करण्याबाबत सूचित केले आहे. प्रत्येक व्‍यावसायिकाने आपल्‍या दुकानामध्‍ये १२० लिटर क्षमतेचे कचरा संकलन डबे (डस्‍ट बीन)  ठेवणे तसेच महानगरपालिकेच्या वाहनामध्ये हा कचरा गोळा करणे अनिवार्य आहे. एवढेच नव्‍हे तर फुलांच्या कच-यापासून अगरबत्ती बनविण्याचे कार्य करणा-या संस्‍थेकडे हा कचरा दररोज देणे अभिप्रेत आहे. मात्र तसे होत नाही. त्यामुळे जी उत्तर विभागाच्‍या बाजार निरीक्षकांनी घनकचरा व्यवस्थापन खात्‍‍याच्‍या अधिका-यांसमवेत बैठक घेतली. कचरा अस्‍ताव्‍यस्‍तपणे न टाकता महानगरपालिकेच्‍या कॉम्पॅक्टरमध्‍येच टाकावा, असे आवाहन करण्‍यात आले. त्याचे उल्‍लंघन केल्यास यापुढील काळात दंडात्‍मक कारवाई करण्‍यात येईल, असा इशारा घनकचरा विभागाच्या उप आयुक्त चंदा जाधव यांनी यावेळी दिला. नवरात्रोत्सवात या परिसरात मोठ्या प्रमाणावर फुलांची आवक होत असते. त्यामुळे येत्या नवरात्रोत्सवात दादर परिसर स्वच्छ दिसेल अशी अपेक्षा आहे.

Previous Post

मोटारगाडीत आढळला ६० किलो गांजा; संशयास्पद टोळीला पोलीसांनी केले अटक

Next Post

चटकदार पदार्थ विकणाऱ्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; FDAकडून धक्कादायक खुलासा

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

चटकदार पदार्थ विकणाऱ्यांकडून ग्राहकांच्या आरोग्याशी खेळ; FDAकडून धक्कादायक खुलासा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (77)
  • पालघर (49)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,197)
  • मुंबई (3,584)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (626)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION