नवी दिल्ली : केंद्रीय गृहमंत्रालयाकडून एक महत्त्वाचा आदेश जारी करण्यात आला आहे. या आदेशानुसार आता ‘वंदे मातरम’साठी उभे राहणे अनिवार्य असेल, चित्रपटगृहांमध्ये वंदे मातरमसाठी उभे राहणे आवश्यक राहणार नाही, परंतु सरकारी कार्यक्रमांमध्ये किंवा शाळांमध्ये पूर्ण सहा श्लोकांचे राष्ट्रगीत वाजवले जाईल, या ठिकाणी उभे राहणे बंधनकारक असेल. यासंदर्भात सर्व राज्ये, केंद्रशासित प्रदेश, मंत्रालये आणि संवैधानिक संस्थांना एक सुचना जारी करण्यात आली आहे. केंद्रीय गृहमंत्रालयाने जारी केलेल्या १० पानांच्या आदेशानुसार, जर राष्ट्रगीत आणि राष्ट्रगान एकाच वेळी गायले गेले तर प्रथम वंदे मातरम वाजवले जाईल. या काळात लोकांनी ‘सावधान’ स्थितीत उभे राहावे लागेल. मंत्रालयाच्या नोटमध्ये कोणकोणत्या ठिकाणी आणि कार्यक्रमांमध्ये वंदे मातरम् आणि राष्ट्रगीत वाजवले जाईल आणि त्याठिकाणी शांततेत उभे राहावे लागेल, यासंबंधीची यादीदेखील जारी करण्यात आली आहे. जर एखाद्या वृत्तचित्र किंवा माहितीपटाच्या काही भागादरम्यान राष्ट्रगीत वाजवले गेले तर उभे राहणे अनिवार्य नाही; राष्ट्रगीताची प्रतिष्ठा वाढवण्याऐवजी यामुळे गोंधळ निर्माण होऊ शकतो. असेही नमुद करण्यात आले आहे. वंदे मातारम् १८७५ मध्ये बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी ७ नोव्हेंबर रोजी या गीताची रचना केली. त्यामुळे ७ नोव्हेंबर २०२५ मध्ये या गीताला १५० वर्ष पूर्ण झाले. या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांकडून ७ नोव्हेंबर २०२५ ते ७ नोव्हेंबर २०२६ या संपूर्ण वर्षासाठी देशव्यापी मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेचाच भाग म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.
राष्ट्रगीत कुठे अनिवार्य आहे :
१. नागरी सन्मान समारंभात.
२. राष्ट्रपतींचे आगमन आणि औपचारिक राज्य कार्यक्रम आणि इतर सरकारी कार्यक्रमांमधून निघून जाताना.
३. ऑल इंडिया रेडिओ आणि दूरदर्शनवर राष्ट्रपतींचा राष्ट्राला संदेश प्रसारित होण्यापूर्वी आणि नंतर.
४. राज्यपाल/लेफ्टनंट राज्यपालांचे त्यांच्या राज्य/केंद्रशासित प्रदेशात औपचारिक राज्य कार्यक्रमांमधून आगमन आणि निघून जाताना.
५. जेव्हा राष्ट्रध्वज परेडमध्ये आणला जातो.
६. भारत सरकारने विशेष आदेश जारी केलेल्या इतर कोणत्याही प्रसंगी राष्ट्रगीत वाजवले जाईल.






