मुंबई : दहीहंडी २०२५ उत्सवात जय जवान गोविंदा पथकाने एका दिवसात तीन वेळा १० थरांचा मानवी मनोरा उभारत ऐतिहासिक कामगिरी केली. या अद्वितीय क्रीडासाधनेची दखल घेत, महाराष्ट्र राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत साहेब यांच्या शुभहस्ते आपल्या पथकाला रुग्णवाहिका (Ambulance) प्रदान करण्यात येत आहे.
ही केवळ सन्मानाची बाब नाही, तर आपण करत असलेल्या समाजसेवेच्या दिशेने उचललेले एक महत्त्वाचे पाऊल आहे. अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेली ही इच्छा आज साकार होत असून, ही रुग्णवाहिका परिसरातील मध्यमवर्गीय नागरिक, गरजू व समाजसेवेसाठी समर्पित केली जाणार आहे. हा क्षण आपल्या प्रत्येक खेळाडूच्या मेहनत, त्याग, जिद्द आणि एकतेचा गौरव आहे. त्यामुळे सर्व खेळाडूंनी अनिवार्यपणे उपस्थित राहून या ऐतिहासिक व प्रेरणादायी क्षणाचे साक्षीदार व्हावे, ही नम्र विनंती. चला, आपल्या क्रीडायशाला समाजसेवेची दिशा देऊया. “जनसेवा हीच ईश्वरसेवा” या मूल्यांसह पुढे जाऊया. हा सोहळा मुंबई एअरपोर्ट पार्किंग परिसरात रात्री 8 वाजता होणार आहे. जय जवान गोविंदा पथकाचे प्रशिक्षक संदीप ढवळे यांच्यासह 1000 गोविंदांनी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर पक्षप्रवेश केला आहे.







