मुंबई : एटीएम मशिनवर प्लॅस्टिकची पट्टी लावून पैसे काढून नागरिकांना फसवणाऱ्या टोळीला मुंबईच्या मालाड पोलिसांनी अटक केली आहे. या टोळीचा एटीएमवर चोरी करण्याचा प्रकार पाहून पोलीस चक्रावलेत. अटकेत असलेले चोरांनी एटीएममधून पैसे चोरण्यासाठी मोठी शक्कल लढवली होती. चोराची शक्कल पाहून पोलीसही हैरान झालेत.
मालाड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या टोळीतील दोन जणांना अटक केलीय. अटक करण्यात आलेल्या २ जणांवर मुंबई आणि पुण्यात ६ गुन्हे दाखल आहेत. अटकेत असलेली टोळी एटीएम मशिनवर पट्टी लावून देत. आणि एटीएमच्या बाहेर थांबत. एटीएममधून पैसे काढण्यासाठी ग्राहक आल्यावर बाहेर थांबायची. एटीएममधून पैसे बाहेर पडत नाहीत. कदाचित एटीएममध्ये बिघाड आहे, असे ग्राहकांना वाटायचे. त्यामुळे ग्राहक तिथून निघून जात. यानंतर हे चोरटे एटीएममध्ये घुसून अडकलेली रक्कम प्लास्टिकची पट्टी काढून घेत आणि पैसे लंपास करत. चोराच्या या प्रकरातून ग्राहकांची मोठ्या प्रमाणावर फसवणूक झाल्यानंतर उघडकीस आले आहे. एटीएममधील सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये ही घटना कैदी झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला. यानुसार पोलिसांनी या टोळीतील दोन जणांना अटक केली आहे. लोक अतिशय हुशारीने एटीएम मशीनमधून पैसे काढून इतर एटीएमला टार्गेट करायचे. पोलिसांनी अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून प्लास्टिक पट्टीसह रोख रक्कम जप्त केली आहे सध्या हे दोन्ही आरोपी मालाड पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस अधिकचा तपास करत आहेत.





