मुंबई : लाडकी योजना १८ नोव्हेंबरनंतर बंद होणार असल्याचा दावा करणारा मेसेज व्हायरल होतोय.राज्यात दीड कोटीपेक्षा लाडकी योजनेच्या लाभार्थी आहेत. हा मेसेज व्हायरल होत असल्याने अनेक लाडकींना धक्का बसलाय. मात्र, खरंच लाडकी योजना बंद होणार आहे का? याची सत्यता जाणून घेणं गरजेचं आहे. कारण, राज्यात दीड कोटीपेक्षा जास्त महिला लाभार्थी असल्याने आम्ही याची पडताळणी सुरू केली.
१८ नोव्हेंबरनंतर लाडकी बहीण योजना लवकरच बंद होणार आहे. सरकारला लाडकीचा खर्च परवडत नाहीये. हा दावा करण्यात आलाय. त्यामुळे अनेकांना यावर विश्वास बसतोय. कारण, ग्रामीण भागात अनेक लाडकींची ईकेवायसी झालेली नाही. त्यामुळे अनुदान मिळण्यास उशीर होत आहे. ईकेवायसी करण्यासाठी सरकारची वेबसाईट आहे. त्यासाठी अधिकृत वेबसाइट https://ladakibahin.maharashtra.gov.in देण्यात आलीय. यासाईटवरून ईकेवायसी करू शकता. मात्र, ही योजना बंद होणार आहे का? याची माहिती मिळवली. तसंच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनीच लाडकी बद्दल माहिती दिलीय. लाडकी बहिणींच्या वेबसाईटमध्ये बदल केले जातायत.ज्या महिलेच्या पतीचं निधन झालं असेल त्यांच्या डेथ सर्टिफिकेट अपलोड करण्यासाठी वेबसाईटमध्ये बदल केला जातोय. यामुळे अनुदान मिळण्यास वेळ लागतोय.मात्र, लाडकी बहीण योजना बंद होणार असल्याचा दावा पडताळणीत असत्य ठरलाय.







