• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

खाजगी ट्रॅव्हल्सना शिवनेरीची टक्कर! आता मुंबई-पुण्याबाहेरही धावणार ‘महामार्गाची राणी’

महिला आणि ज्येष्ठांना ५०% सवलत कायम

admin by admin
March 5, 2026
in पुणे, महाराष्ट्र, मुंबई
0
खाजगी ट्रॅव्हल्सना शिवनेरीची टक्कर! आता मुंबई-पुण्याबाहेरही धावणार ‘महामार्गाची राणी’
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : मुंबई–पुणे महामार्गाची ‘राणी’ म्हणून ओळख मिळवलेल्या एसटीच्या अत्याधुनिक, आरामदायी आणि सुरक्षित ‘शिवनेरी’ बस सेवेची झेप आता राज्यभर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लवकरच मुंबई–पुणे मार्गाच्या पलीकडे महाराष्ट्रातील प्रमुख शहरांदरम्यान शिवनेरी धावणार असल्याची माहिती परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली. २००२ मध्ये सुरू झालेल्या शिवनेरी सेवेने वक्तशीरपणा, उत्कृष्ट आसनव्यवस्था आणि सुरक्षित प्रवास या गुणवैशिष्ट्यांमुळे उच्च मध्यमवर्गीय प्रवाशांचा विश्वास जिंकला. इतर बससेवेपेक्षा तिकीटदर थोडे अधिक असतानाही सातत्याने मिळणाऱ्या उत्तम प्रतिसादामुळे ही सेवा सुरुवातीपासूनच नफ्यात आहे, असे मंत्री सरनाईक यांनी स्पष्ट केले.

राज्यभर विस्तारासाठी २०० नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानयुक्त व्होल्व्हो बसेस खरेदी करण्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. या बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होताच, मुंबई–पुणेप्रमाणेच इतर महत्त्वाच्या शहरांदरम्यानही शिवनेरी सेवा सुरू होईल. नाशिक–पुणे, नाशिक–छत्रपती संभाजीनगर, नाशिक–जळगाव–धुळे, पुणे–कोल्हापूर, पुणे–सांगली, पुणे–सोलापूर, नागपूर–चंद्रपूर, नागपूर–अमरावती–अकोला अशा प्रमुख शहरांचा समावेश आहे. त्यामुळे राज्याच्या विविध भागांतील प्रवाशांना आलिशान, सुरक्षित आणि विश्वासार्ह प्रवासाचा पर्याय उपलब्ध होणार आहे. सध्या दादर–स्वारगेट, दादर–शिवाजीनगर, बोरीवली–स्वारगेट, बोरीवली–शिवाजीनगर, ठाणे–स्वारगेट आणि ठाणे–शिवाजीनगर या मार्गांवर पर्यावरणपूरक ई-शिवनेरी बस सेवा सुरू असून प्रवाशांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. महिला प्रवाशांना तसेच ६५ ते ७५ वयोगटातील ज्येष्ठ नागरिकांना तिकीटदरात ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील ज्येष्ठांना शिवनेरी प्रवास पूर्णपणे विनामूल्य आहे. त्यामुळे नव्या मार्गांवरही मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळेल, असा विश्वास मंत्री सरनाईक यांनी व्यक्त केला. नवीन २०० बसेसमध्ये ३० शयनयान (स्लिपर) बसेसचा समावेश असेल. सध्या ज्या मार्गांवर विना-वातानुकूलित शयनयान बससेवा आहे, त्या ठिकाणी ‘स्लिपर शिवनेरी’ सुरू करून प्रवासी सेवेला अधिक उन्नत रूप दिले जाणार आहे. आरामदायी बेड-कोच सुविधा, सुरक्षितता आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे दीर्घ पल्ल्याच्या प्रवासात प्रवाशांना नव्या अनुभवाची हमी मिळणार आहे. ‘शिवनेरी’चा हा विस्तार म्हणजे केवळ बससेवेची वाढ नव्हे, तर महाराष्ट्राच्या प्रगत आणि गतिमान प्रवाससंस्कृतीची नवी दिशा आहे.असे प्रतिपादन परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केले आहे.

Previous Post

८ ते २२ मार्चदरम्यान जिल्ह्यात ‘जल महोत्सव’ साजरा होणार

Next Post

क्रिकेटप्रेमींना दिलासा! टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीसाठी आज ‘मेट्रो ३’ धावणार रात्री १२ पर्यंत

admin

admin

Next Post
क्रिकेटप्रेमींना दिलासा! टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीसाठी आज ‘मेट्रो ३’ धावणार रात्री १२ पर्यंत

क्रिकेटप्रेमींना दिलासा! टी-२० विश्वचषक उपांत्य फेरीसाठी आज 'मेट्रो ३' धावणार रात्री १२ पर्यंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,728)
  • मुंबई (3,301)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

महापुराच्या फटक्यानंतर अवघ्या तीन दिवसांत डहाणू-बोर्डी मार्ग वाहतुकीसाठी खुला; पालघर प्रशासनाची विक्रमी कामगिरी!

July 27, 2026
मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

मालाड खाडीत देशातील पहिला ‘इंटरसेप्टर’ प्रकल्प; समुद्रात जाण्यापूर्वीच प्लास्टिक कचरा अडवणार

July 27, 2026
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION