पुणे : येत्या काही दिवसांवर होळी सण आलेला आहे. या सणानिमित्ताने गावी जाणाऱ्यांची संख्या प्रत्येक रेल्वे स्थानकावर मोठ्या प्रमाणात होत असते. या सर्व पाश्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता चेंगराचेंगरी टाळण्यासाठी पुणे रेल्वे स्थानकावर एक नवा प्लॅन करण्यात आलेला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, होळी सणाच्या पार्श्वभूमीवर बाहेरगावी जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढत असल्याने पुणे रेल्वेस्थानक येथे मोठी गर्दी होत आहे. ही सर्व गर्दीची परिस्थिती लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने विशेष तयारी सुरू केली आहे. स्थानक परिसरात प्रशासन ॲक्टिव्ह मोडमध्ये काम करताना दिसले. स्थानकाती प्लॅटफॉर्मलगत असलेल्या पार्सल विभागाशेजारी होल्डिंग एरिया तयार करण्यात आला आहे. या ठिकाणी उत्तर भारतासह इतर राज्यांत जाणाऱ्या होळी विशेष गाड्यांच्या प्रवाशांना थांबवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. स्थानकावर अनावश्यक गर्दी होऊ नये आणि कोणतीही दुर्घटना घडू नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.







