मुंबई : महापरिनिर्वाण दिनी रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीला नियंत्रणात ठेवण्यासाठी मध्य रेल्वेने १३ महत्त्वाच्या स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. आजपासूनच ही बंदी लागू होते. प्रवाशांची सुरक्षित रेल्वे चढउतार व्यवस्था, सुरळीत वाहतूक आणि आपत्कालीन परिस्थितींवर वेगाने प्रतिसाद देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
५ डिसेंबर ते ७ डिसेंबर २०२५ या कालावधीत ही बंदी लागू राहील. मात्र, रेल्वे बोर्डाच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, ज्येष्ठ नागरिक, आजारी प्रवासी, मुले तसेच मदतीची आवश्यकता असलेल्या महिला प्रवाशांसाठी प्लॅटफॉर्म तिकिटांची मुभा राहील. ५ ते ७ डिसेंबर या स्थानकांवर सेवा बंद- छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , दादर स्टेशन ५-६ डिसेंबर या स्थानकांवर बंद- भुसावळ , नाशिक रोड , मनमाड, जळगाव , अकोला , शेगाव, पाचोरा, बडनेरा, मलकापूर, चाळीसगाव, नागपूर हापरिनिर्वाण दिनानिमित्त अनुयायांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने १३ प्रमुख स्थानकांवर प्लॅटफॉर्म तिकिट विक्री तात्पुरती बंद करण्यात येत आहे. मात्र, लहान मुले, ज्येष्ठ नागरिक, आजारी किंवा दिव्यांग प्रवाशांसोबत आलेल्या नागरिकांसाठी ही सवलत लागू राहील.







