मुंबई : शालेय अभ्यासक्रमात आता पहिलीपासून दहावीपर्यंत टप्प्याटप्प्याने कृषी विषयाचा समावेश केला जाणार आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरण-२०२० व राज्य अभ्यासक्रम आराखडा शालेय शिक्षण २०२४ यांच्यामध्ये ‘व्यवसाय शिक्षणाची नवकल्पना’ याचा समावेश आहे. त्या अंतर्गत २०२५-२६ या वर्षी इयत्ता पहिलीच्या अभ्यासक्रमामध्ये कार्य शिक्षण या विषयांतर्गत कृषी शिक्षणाचा समावेश करण्यात आलेला आहे.
पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीपर्यंतच्या अभ्यासक्रमात कृषी विषयाचा समावेश करण्यासंदर्भात शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी मंत्रालयात बैठक झाली. वय वर्षे ३ ते ८ मधील विद्यार्थ्यांना कार्य शिक्षण या विषयांतर्गत २१ व्या शतकातील महत्त्वपूर्ण कौशल्ये, तसेच कृषी, पर्यटन व्यावसायिकतेचा पाया याच सुरुवातीपासून घातला जाईल, अशा उपक्रमांची मांडणी करावी, अशी सूचना राज्यमंत्री भोयर यांनी बैठकीत दिल्या.