मुंबई : नववर्षाच्या अनुषंगाने शहरात अनुचित घटना घडू नये याची खबरदारी मुंबई पोलिसांनी घेतली आहे. 10 हजार पोलीस कर्मचारी, दीड हजार अधिकारी, 25 पोलीस उपायुक्त, सात अतिरिक्त आयुक्त असा तगडा बंदोबस्त असणार आहे.
मुंबई पोलिसांच्या मदतीला एसआरपीएफच्या ४६ तुकडय़ा, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन आणि शीघ्र कृती दलाच्या १५ तुकडय़ा तैनात केल्या जाणार आहेत.
अवैध दारू, ड्रग्जची तस्करी करणाऱयांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. ३१ डिसेंबरच्या रात्री मुंबईतील रस्त्यावर पोलिसांचा तगडा पोलीस बंदोबस्त असणार आहे. १० हजार पोलीस कर्मचारी, दीड हजार अधिकारी, २५ पोलीस उपायुक्त, सात अतिरिक्त आयुक्त, एसआरपीएफच्या ४६ तुकडय़ा, दंगल नियंत्रण पथकाच्या तीन आणि शीघ्र कृती दलाच्या १५ तुकडय़ा तैनात केल्या जाणार आहेत. महिला छेडछाडीच्या घटना घडू नये म्हणून सध्या वेशात पोलीस तैनात केले जाणार आहे.