मुंबई : सीमाशुल्क विभागाने गेल्या तीन दिवसांत मुंबई विमानतळावर केलेल्या कारवाईत आठ किलो सोने जप्त केले. त्याची किंमत चार कोटी रुपये आहे. याशिवाय पाच आयफोनही सीमाशुल्क विभागाने जप्त केले.
याप्रकरणी सीमाशुल्क विभागाने केलेल्या कारवाईत केनियातून आलेल्या एका महिलेला २१६९ ग्रॅम सोन्यासह अटक केली. सादिया मोहम्मद अली असे या महिलेचे नाव आहे. याशिवाय आणखी आठ प्रवाशांकडून सोने व पाच आयफोन जप्त करण्यात आले. त्यात तीन परदेशी नागरिकांचा समावेश आहे.