Categories
गुन्हेगारी पुणे पुणे जिल्हा

नवले पुल अपघातात मराठी अभिनेत्याचा मृत्यू, ३ महिन्यांचा चिमुकला पितृछत्रहीन!

पुणे: गुरुवारी १३ नोव्हेम्बर रोजी पुण्यातील नवले पुलाजवळ भीषण अपघात झाला होता. या अपघातात एकूण ९ जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. यात एका कारमधील पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यामध्ये कारचालक असलेल्या ३० वर्षीय मराठी अभिनेता धनंजय कोळी याचा दुर्दैवी मृत्यू झाला. धनंजय कोळी यांच्या घरी तीन महिन्यांपूर्वी चिमुकल्या लेकराचं आगमन झालं होत. आता या तीन महिन्यांचा चिमुकल्याचा डोक्यावरून बापाचं छत्र कायमचं हरपलं आहे.

अपघातावेळी धनंजय कोळी यांची कार दोन ट्रकच्या मधोमध अडकली आणि कारमधील पाच जणांना बाहेर पडता आला नाही. अचानक आग लागल्याने आगीत सर्वांचा होरपळून मृत्यू झाला. यात धनंजय कोळी यांचा देखील समावेश होता. धनंजय कोळी यांना तीन महिन्यांचा मुलगा आहे. आता त्या बाळाच्या डोक्यावरून बापाचं छत्र कायमचं हरपलं आहे. अपघात झाला तेव्हा त्याची पत्नी आणि मुलगा लातूर येथे होते, तर आई-वडील पुण्यात होते. धनंजय सहा महिन्यांपासून वाहतुकीचा व्यवसाय करत होता. त्यापूर्वी तो एका खासगी कंपनीत काम करत होता. धनंजय मूळचा कोल्हापूर जिल्ह्यातील जयसिंगपूरचा आहे. धनंजय गेल्या काही वर्षांपासून पिंपरी-चिंचवड परिसरातील चिखली येथे राहत होता. त्याने काही नाटकांमध्ये भूमिकाही साकारल्या आहेत. इन्स्टाग्राम प्रोफाईलवरती त्याने स्वतःचा अभिनेता असा उल्लेख केला आहे. नवले पुलाजवळ झालेल्या अपघातात तीन महिन्यांच्या मुलाने पितृछत्र हरपल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.