पुणे : डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली प्रवेश रद्द करण्यात आल्यामुळे पुण्यातील सिंहगड लॉ कॉलेजच्या विरोधात विद्यार्थिनी आक्रमक झाली आहे. ही विद्यार्थीनी रस्त्यावर उतरून आंदोलन करत आहे. दिव्या शिंदे असं आंदोलन करणाऱ्या विद्यार्थिनीचे नाव आहे. तिने डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या नावाखाली सिंहगड लॉ कॉलेजने प्रवेश रद्द केला असल्याचा आरोप केला आहे.
सिंहगड लॉ कॉलेजच्या मनमानी कारभाराविरोधात दिव्या शिंदे या विद्यार्थिनीने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर आंदोलन सुरू केले आहे. सिंहगड लॉ कॉलेज प्रशासनावर कारवाई करण्याची मागणी तिने केली आहे. सिंहगड लॉ कॉलेज डॉक्युमेंट वेरिफिकेशनच्या नावाखाली विद्यार्थ्यांना प्रवेश नकारत आहे. तसेच पाचव्या राऊंडच्या आधीच्या चौथ्या राऊंडमध्ये कॉलेज प्रशासनाने मॅनेजमेंटच्या सीट कोटा भरला आणि पात्र विद्यार्थ्यांकडे डोनेशनची मागणी केली, असा आरोप विद्यार्थिनी दिव्या शिंदेने केला आहे.