• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावे, महापालिकेचे आवाहन

admin by admin
January 21, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
माघी गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्ये करावे, महापालिकेचे आवाहन
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : माघी गणेशोत्सवाला २२ जानेवारीपासून सुरुवात होत असून गणेशोत्सव पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा यासाठी ६ फुटांपर्यंत उंच गणेशमूर्तींचे नदी, समुद्र, तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांऐवजी महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच विसर्जन करावे, असे आवाहन पुन्हा एकदा मुंबई महानगरपालिकेने माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने केले आहे. त्याचबरोबर रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी पाण्यात विसर्जित करू नये, असे महापालिकेने स्पष्ट केले आहे. माघी गणेशोत्सवानिमित्त मुंबई महानगरपालिकेने सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी ‘तात्पुरता मंडप उभारणी’ परवानगीकरिता ऑफलाईन पद्धतीने एक खिडकी योजना सुरू केली आहे. तसेच मंडप उभारणी परवानगीसाठी १०० रुपये इतके नाममात्र शुल्क आकारण्यात आले आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त आणि प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनात विविध स्तरीय नियोजन व अंमलबजावणी करण्यात येत आहे. यानुसार माघी गणेशोत्सवात गणेशमूर्तींचे विसर्जन पर्यावरणपूरक, सुरक्षित आणि सुरळीत पद्धतीने पार पडावे, यासाठी महानगरपालिकेने आवश्यक उपाययोजना व अतिरिक्त सुविधा उपलब्ध केल्या आहेत. त्याचबरोबर ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (एमपीसीबी), तसेच ‘केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळ’ (सीपीसीबी) यांनी जारी केलेल्या सुनिश्चित कार्यपद्धती (एसओपी) व मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत आहे.

उच्च न्यायालयाच्या निर्देशांनुसार नैसर्गिक जलस्रोतमध्ये होणारे प्रदूषण टाळण्यासाठी गणेशमूर्तींचे नद्या, समुद्र, तलाव किंवा इतर नैसर्गिक पाणीसाठ्यांमध्ये विसर्जन करू नये. मुंबई महानगरपालिकेने उपलब्ध केलेल्या कृत्रिम तलावांमध्येच गणेशमूर्तींचे विसर्जन करावे, असे आवाहन महानगरपालिका प्रशासनाने सार्वजनिक श्रीगणेशोत्सव मंडळे व भाविकांना पुन्हा एकदा केले आहे. माघी गणेशोत्सव २०२६ संदर्भात महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने १८ ऑगस्ट २०२५ रोजी जाहीर केलेल्या कार्यपद्धतीनुसार आणि २६ ऑगस्ट २०२५ च्या परिपत्रकानुसार ६ फुटांपर्यंत उंचीच्या मूर्तींचे विसर्जन करण्यासाठी आवश्यक असणाऱ्या कृत्रिम तलावांची निर्मिती करण्यात येणार आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या सुनिश्चित कार्यपद्धतीनुसार (SOP) रंगीत रसायने, थर्माकोल, प्लास्टिक, कापड, फुले, हार, सजावटीचे साहित्य इत्यादी घटक पाण्यात विसर्जित करण्यास बंदी आहे. त्यामुळे सार्वजनिक मंडळांनी, तसेच भाविकांनी निर्माल्य हे निर्माल्य कलशातच टाकावे, असे आवाहन महापालिकेने केले आहे. गणेशमूर्तींचे विसर्जन सुलभ व्हावे, यासाठी महानगरपालिका गरजेनुसार कृत्रिम तलावांची उभारणी करीत आहे. एकूणच, माघी गणेशोत्सव २०२६ पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा व्हावा आणि नैसर्गिक जलस्रोतांचे प्रदूषण टाळावे, यासाठी गणेशमूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावांमध्येच करावे, उच्च न्यायालय, तसेच प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उप आयुक्त तथा गणेशोत्सव समन्वयक प्रशांत सपकाळे यांनी केले.

Previous Post

दहावी, बारावीच्या परीक्षा कॉपीमुक्त अभियानासाठी शिक्षण मंडळ सज्ज

Next Post

२७ वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम! अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची नासामधून निवृत्ती

admin

admin

Next Post
२७ वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम! अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची नासामधून निवृत्ती

२७ वर्षांच्या कारकीर्दीला पूर्णविराम! अंतराळवीर सुनीता विल्यम्स यांची नासामधून निवृत्ती

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,094)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (99)
  • नाशिक (75)
  • पालघर (67)
  • पालघर (45)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,727)
  • मुंबई (3,300)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (46)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (205)

Follow Us

Recent News

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

धर्मेंद्र प्रधानांच्या राजीनाम्यानंतर प्रल्हाद जोशी यांच्याकडे शिक्षण मंत्रालयाचा कार्यभार

July 27, 2026
वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

वसईतील ‘या’ प्रसिद्ध धबधबे, समुद्रकिनाऱ्यांवर ३ ऑगस्टपर्यंत प्रवेशबंदी; पोलिसांचे कडक आदेश

July 27, 2026
७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

७.४७ लाख वारकऱ्यांची माऊलीप्रमाणे काळजी; मोफत आरोग्य सेवेला भाविकांचा उदंड प्रतिसाद

July 27, 2026
मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

मुंबईत २९ शासकीय सेवा एकाच छताखाली, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद!

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION