• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

धर्मादाय आयुक्तांचे संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करा; उच्च न्यायालयाचे आदेश

admin by admin
May 26, 2025
in मुंबई, विशेष लेख
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : राज्य धर्मादाय आयुक्तालयाचे संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करण्याच्यादृष्टीने आवश्यक त्या उपाययोजना करा, असे आदेश उच्च न्यायालयाने नुकतेच राज्य सरकार आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिले. संकेतस्थळाच्या सुरळीत कामकाजासाठी राज्य सरकार मदत करत नसल्याचा दावा एकीकडे धर्मादाय आयुक्त कार्यालयाने केला तर आयुक्त कार्यालयाने आवश्यक तपशील दिले नसल्याचा प्रतिदावा राज्य सरकारच्या महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळ लिमिटेडने (एमएएचए आयटी) केला. या दोघांच्या आरोप-प्रत्यारोपांच्या पार्श्वभूमीवर न्यायालयाने संकेतस्थळ तातडीने कार्यान्वित करण्याचे आदेश दोघांना दिले. संकेतस्थळाशी संबंधित सर्व समस्या सोडवण्यासाठी धर्मादाय आयुक्त कार्यालयाला महाआयटीशी संपर्क साधता यावा याकरिता एका अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचे आदेशही न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी आणि न्यायमूर्ती अद्वैत सेठना यांच्या खंडपीठाने दिले. धर्मादाय आयुक्तांच्या संकेतस्थळाबाबतीत गंभीर समस्या असल्याचे दिसून येत असल्याची टिप्पणी देखील खंडपीठाने उपरोक्त आदेश देताना केली. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्यांचे संकेतस्थळ कार्यरत असल्याचा अहवाल सादर केला असला तरी त्यात तथ्य नाही, असेही न्यायालयाने म्हटले. राज्य धर्मादाय आयुक्तांच्या अंतर्गत नियुक्त अधिकाऱ्यांसमोर ई-फायलिंग करण्याचा पर्याय उपलब्ध नसल्याचा मुद्दा श्रद्धा मोरे यांनी याचिकेद्वारे न्यायालयासमोर आणला होता. या याचिकेवरील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने उपरोक्त आदेश आणि टिप्पणी केली. तत्पूर्वी, धर्मादाय आयुक्तांनी न्यायालयात एक अहवाल सादर केला होता. त्यात, आयुक्त कार्यालयाचे संकेतस्थळ ऑगस्ट २०१६ पासून कार्यरत आहे आणि महा आयटी तिचे व्यवस्थापन करत असल्याचे म्हटले होते. शिवाय, धर्मादाय आयुक्त कार्यालयाला राज्य विदा केंद्राच्या सर्व्हरवर दरमहा सुमारे ५०० जीबी जागा आवश्यक आहे. तथापि, ती प्रदान केली जात नव्हती आणि म्हणूनच संकेतस्थळ अनेक दिवसांपासून कार्यरत नसल्याचेही अहवालात म्हटले होते. धर्मादाय आयुक्त कार्यालयाने राज्य माहिती व तंत्रज्ञान तसेच कायदा व न्याय विभागांना पत्र लिहून सर्व्हरवर आवश्यक जागा उपलब्ध करण्याही विनंती कली होती, असे देखील अहवालात म्हटले होते. अलीकडेच १४.९९ टीबी जागा उपलब्ध करून देण्यात आली होती. परंतु, काही तांत्रिक समस्यांमुळे संकेतस्थळ बंद होते. तथापि, या समस्या सोडवण्यात आल्या आहेत आणि संकेतस्थळ आता सुरळीतपणे कार्यरत असल्याचा दावा अहवालात करण्यात आला होता.

त्याचप्रमाणे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाने एका सक्षम एजन्सीद्वारे नवीन संकेतस्थळ तयार करण्यास सुरुवात केली असल्याचेही आयुक्त कार्यालयाने अहवालात म्हटले होते. दुसरीकडे, धर्मादाय आयुक्त कार्यालयाकडून अनेक मुद्द्यांवर विलंबाने उत्तरे दिली जातात. परिणामी, आम्हाला आवश्यक ते काम करता येत नाही, असे महाआयटीतर्फे न्यायालयाला सांगण्यात आले. दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकल्यानंतर न्यायालयाने धर्मादाय आयुक्तांना वार्षिक देखभाल करार करणाऱ्या महा आयटी कर्मचाऱ्यांशी संपर्क साधता यावा एक अधिकारी नियुक्त करण्याचे आदेश दिले. सर्व्हर अपग्रेड करण्यासाठी आणि अद्ययावत तांत्रिक आवश्यकता स्थापित करण्यासाठी आवश्यक असलेल्या सर्व उपाययोजना शक्य तितक्या लवकर म्हणजेच तीन आठवड्यांच्या आत पूर्ण करा, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले. सर्व्हर अपग्रेड करण्यासाठी आणि क्लाउड स्पेस खरेदी करण्यासाठी तात्काळ आर्थिक मदत देण्याचे आदेशही न्यायालयाने सरकारला दिले. तर सहाय्यक किंवा उपधर्मादाय आयुक्तांतर्फे संकेतस्थळावरील तपशील अद्ययावत केला जात नाही, असे निरीक्षण नोंदवून धर्मादाय आयुक्तांनी त्यांच्या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना सर्व कार्यवाहीचा तपशील अद्ययावत करण्याचे आदेश द्यावेत. तसेच, आदेश आणि कार्यवाहीचा तपशील संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यासाठी कोणताही विलंब करू नये, असे आदेश न्यायालयाने धर्मादाय आयुक्त कार्यालयाला दिले आहेत. त्याचप्रमाणे, प्रकरणाची पुढील सुनावणी ११ जून रोजी ठेवताना तोपर्यंत सरकार आणि धर्मादाय आयुक्त कार्यालयाने त्यांचे अनुपालन प्रतिज्ञापत्र दाखल करावे, असेही न्यायालयाने स्पष्ट केले.

Previous Post

शासकीय सीसीटीव्ही कॅमेऱ्यांच्या ८० हजार किंमतीच्या बॅटरींची चोरी

Next Post

जोरदार पाऊसामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद

admin

admin

Next Post

जोरदार पाऊसामुळे सीएसएमटी ते वडाळा रोड लोकल सेवा बंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (30)
  • कोकण (49)
  • कोल्हापूर (26)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,050)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (453)
  • नवी मुंबई (206)
  • नागपूर (95)
  • नाशिक (68)
  • पालघर (62)
  • पालघर (43)
  • पुणे (956)
  • पुणे जिल्हा (200)
  • महाराष्ट्र (1,426)
  • मुंबई (3,111)
  • रत्नागिरी (44)
  • राजकीय (244)
  • रायगड (37)
  • राष्ट्रीय (420)
  • वसई-विरार (24)
  • विशेष लेख (621)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (8)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (196)

Follow Us

Recent News

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

१ ऑगस्टपासून महिला व ज्येष्ठांसाठी ‘NCMC’ स्मार्ट कार्ड बंधनकारक! – परिवहनमंत्री प्रताप सरनाईक

June 12, 2026
व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

व्हॉट्सॲप चॅटबॉटद्वारे २४ तासांत ॲक्शन; ‘ट्रॅफिक बडी’मुळे वाहतुकीच्या तक्रारींचे निवारण वेगात

June 12, 2026
पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

पुणेकरांची पाण्यासाठी वणवण? महापालिकेने जाहीर केले नवे वेळापत्रक

June 12, 2026
‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

‘पक्षात कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही’; सुनेत्रा पवारांचा ज्येष्ठ नेत्यांना स्पष्ट इशारा!

June 12, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION