• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र नवी मुंबई

“महाराष्ट्र माझ्या हातात कधी देताय, याची मी वाट पाहतोय” – राज ठाकरेंचं विधान

admin by admin
October 26, 2026
in नवी मुंबई, महाराष्ट्र
0
“महाराष्ट्र माझ्या हातात कधी देताय, याची मी वाट पाहतोय” – राज ठाकरेंचं विधान
Share on FacebookShare on WAShare on Twitter

नवी मुंबई : मुंबईसह राज्यातील शहरांमधील वाहतूक कोंडी, बेशिस्त पार्किंग आणि पायाभूत सुविधांच्या नियोजनावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी टीका केली. वाहतूक व्यवस्थेला शिस्त लावण्यासाठी कठोर नियम आणि त्यांची प्रभावी अंमलबजावणी आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. “महाराष्ट्र माझ्या हातात कधी येतोय, याची मी वाट पाहतोय,” असे विधान त्यांनी नवी मुंबईतील वाहतूक सेनेच्या व्यावसायिक वाहन प्रदर्शन आणि भव्य वाहतूकदार मेळाव्यात केले. वाहतूकदारांशी चर्चा केल्याचा उल्लेख करत राज ठाकरे म्हणाले की, ई-चलानला विरोध नाही; मात्र ते ज्या पद्धतीने आकारले जाते, त्याची तपासणी झाली पाहिजे. ई-चलान कॅमेऱ्याच्या माध्यमातून दिले जावे. प्रत्यक्ष व्यक्तींकडे जाऊन चलान फाडण्याच्या प्रकारावरही त्यांनी प्रश्न उपस्थित केला. वाहतुकीचा प्रश्न गंभीर झाला असून, तो भविष्यात आणखी आक्राळविक्राळ होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

वाहतुकीसाठी आवश्यक नियम आणि बंधनांची चौकटच पुरेशी नसल्याची टीकाही त्यांनी केली. देशातील वाहतूक व्यवस्था पाहून देशाचे वर्तमान आणि भविष्य लक्षात येते, असे ते म्हणाले. वाहन कसे चालवायचे आणि पार्किंग कसे करायचे, याबाबत नागरिकांबरोबरच सरकारलाही पुरेशी जाणीव नसल्याचे त्यांनी नमूद केले. रस्ते आणि पूल बांधताना दीर्घकालीन नियोजन केले जात नाही. दोन वर्षांनी पुन्हा कामे काढावी लागतील, अशा पद्धतीने रस्त्यांची कामे होत असल्याची टीका त्यांनी केली. वाहतूक सिग्नल असतानाही पुढे वाहतूक पोलीस उभे असतात, यावर त्यांनी उपरोधिक टिप्पणी केली. पूर्वी रात्री एक वाजताही मुंबईत सिग्नल सुरू असेल तर वाहने थांबत होती; मात्र आता दुपारी एक वाजताही सिग्नल पाळला जात नसल्याचे त्यांनी सांगितले. नो-पार्किंग असलेल्या फुटपाथवर काळ्या-लाल रंगाचे, तर पार्किंगच्या जागांवर पिवळ्या-काळ्या रंगाचे पट्टे रंगवण्याचा प्रस्ताव मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि मुंबई महानगरपालिका आयुक्तांसमोर मांडल्याचे राज ठाकरे यांनी सांगितले. वारंवार सांगितल्यानंतर दादरमधील एका फुटपाथवर लाल पट्टे रंगवण्यात आले; मात्र नागरिकांना नियम पाळण्यास कोण सांगणार, असा सवाल त्यांनी केला. एखाद्या क्षेत्रफळाच्या सुमारे १५ टक्के भागात रस्ते असणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. पूर्वी ५० लोक राहत असलेल्या ठिकाणी आता ५०० लोक राहत आहेत; मात्र त्यांच्या वाहनांच्या पार्किंगची व्यवस्था नाही. विकास होत असला तरी टाऊन प्लानिंग होत नसल्याने नियोजन कोलमडत असल्याचे ते म्हणाले. पोलिसांची वाहने आणि पायलट गाडी सोबत असतानाही आपल्या चालकांना सिग्नल न मोडण्याची ताकीद देत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कितीही महत्त्वाचे काम असले तरी सिग्नल मोडायचा नाही, अशी सूचना आपण देत असल्याचे ते म्हणाले. वाहनांची नोंदणी वाढत असताना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था कमकुवत होत असल्याबद्दल त्यांनी चिंता व्यक्त केली. पुण्यात एक दिवस सर्वांनी वाहने रस्त्यावर आणली, तर वाहतूक ठप्प होईल, असे ते म्हणाले. नवी मुंबईत लाखो प्रवासी रेल्वेने प्रवास करतात. रेल्वे व्यवस्था कोलमडल्यास आणि नागरिकांना खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागल्यास घराबाहेर पडणेही कठीण होईल, असा इशारा त्यांनी दिला. शहरांमध्ये फुटपाथ, मैदाने आणि बागांसाठी जागा कमी होत असून, सर्वत्र टॉवर आणि कॉलन्या उभ्या राहत आहेत. पाणीपुरवठ्यासाठी टँकरवर अवलंबून राहावे लागते. याला शिस्तबद्ध विकास म्हणायचे का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. विकासाचे आराखडे तयार करताना तज्ज्ञांचा सल्ला घेण्याऐवजी बिल्डरांशी जवळीक ठेवली जात असल्याने टाऊन प्लानिंगकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप त्यांनी केला. “अशा गोष्टींना शिस्त लावणे हे रॉकेट सायन्स नाही. त्यासाठी फक्त इच्छाशक्ती लागते,” असे सांगत या प्रश्नांवर सरकारसमोर पुन्हा भूमिका मांडणार असल्याचे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले. तसेच, महाराष्ट्राची सत्ता आपल्या हातात कधी येणार, याची आपण वाट पाहत असल्याचे सांगत त्यांनी जनतेसमोर सत्तेची इच्छा व्यक्त केली.

Previous Post

स्पीडपोस्ट सेवेची व्याप्ती वाढली; महाराष्ट्रात २७ नवीन मार्गिका

Next Post

३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी!

admin

admin

Next Post
३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी!

३०५ दुष्काळग्रस्त तालुक्यांतील दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षा शुल्कमाफी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (65)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,145)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (502)
  • नवी मुंबई (214)
  • नागपूर (116)
  • नाशिक (88)
  • पालघर (49)
  • पालघर (77)
  • पुणे (1,071)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,195)
  • मुंबई (3,582)
  • रत्नागिरी (62)
  • राजकीय (284)
  • रायगड (63)
  • राष्ट्रीय (568)
  • वसई-विरार (69)
  • विशेष लेख (625)
  • सांगली (5)
  • सातारा (18)
  • सिंधुदुर्ग (11)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (214)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION