• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

दादर स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार; विधिमंडळ अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस

admin by admin
November 19, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
दादर स्थानकाचे नाव ‘चैत्यभूमी’ होणार; विधिमंडळ अधिवेशनात प्रक्रिया पूर्ण करणार – मुख्यमंत्री फडणवीस
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईतील चैत्यभूमी येथे येणाऱ्या लाखो अनुयायांसाठी सुरक्षा, वाहतूक, आरोग्य, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांचे काटेकोर नियोजन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. यासोबतच दादर रेल्वे स्थानकाला ‘चैत्यभूमी’ हे नाव देण्याच्या प्रस्तावाला राज्य शासनाने यापूर्वीच तत्त्वतः मान्यता दिली असून, केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करून नामकरणाची कार्यवाही करण्यात येईल, असे त्यांनी स्पष्ट केले. विधानभवनात आयोजित आढावा बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, राज्यमंत्री योगेश कदम, माजी मंत्री संजय बनसोडे, समन्वय समितीचे सरचिटणीस नागसेन कांबळे, भाई गिरकर, विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी, रेल्वे, मुंबई महापालिका, पोलीस प्रशासन तसेच बौद्ध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, दरवर्षी देशभरातून मोठ्या संख्येने अनुयायी चैत्यभूमीवर येत असल्याने सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करून कोणतीही गैरसोय होणार नाही याची दक्षता घ्यावी. मागील वर्षांच्या अनुभवाच्या आधारे उणिवा दूर करून यंदा अधिक प्रभावी नियोजन करण्यात यावे, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. महापरिनिर्वाण दिनाच्या पार्श्वभूमीवर चैत्यभूमी परिसरात कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी धरणे, मोर्चे, निदर्शने अथवा आंदोलनांना बंदी घालण्याबाबत गृह विभागाने आवश्यक कार्यवाही करावी, असे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले. पोलीस आणि प्रशासनाने परिसरात शांततापूर्ण व शिस्तबद्ध वातावरण राखण्यासाठी विशेष दक्षता घ्यावी, असेही त्यांनी सांगितले. वाहतूक व्यवस्थेच्या नियोजनात रेल्वे, रस्ते वाहतूक, स्थानिक परिवहन आणि पोलीस विभागांनी समन्वय साधून भाविकांचा प्रवास सुरळीत होईल यासाठी उपाययोजना करण्याच्या सूचना देण्यात आल्या. तसेच ऑटोरिक्षांच्या प्रवेशाचे नियोजन आणि पुढील प्रवासासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सर्व पुतळ्यांची स्वच्छता आणि सुशोभीकरण पुढील पाच ते सात दिवसांत पूर्ण करण्याचे निर्देश दिले. महापरिनिर्वाण दिनाचे गांभीर्य कायम राखण्यासाठी उत्सवी कार्यक्रम टाळून डॉ. आंबेडकर यांच्या विचारांशी संबंधित चित्रपट किंवा प्रबोधनपर उपक्रम आयोजित करण्याबाबतही विचार सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. इंदू मिल येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारकाच्या उर्वरित कामासाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करत, कामाचा वेग वाढवण्यासाठी पुढील आठवड्यात स्वतंत्र बैठक घेण्यात येणार असल्याची माहितीही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली. दादर रेल्वे स्थानकाच्या ‘चैत्यभूमी’ नामकरणासंदर्भात केंद्र सरकारकडून प्राप्त मार्गदर्शनानुसार विधिमंडळाच्या अधिवेशनात आवश्यक प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. त्यानंतर नामकरणाची कार्यवाही पुढे नेली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून येणाऱ्या अनुयायांना सुरक्षित, सन्मानपूर्वक आणि सुलभ सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. तसेच यंदाचा महापरिनिर्वाण दिन शिस्तबद्ध, सुरक्षित आणि सुरळीत पार पडेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Previous Post

पालकांची धावपळ आता थांबणार! महापालिका रुग्णालयात जन्मलेल्या बाळांना ३ दिवसांत मिळणार जन्मदाखला

Next Post

सिझेरियन प्रसूतीच्या वाढत्या प्रमाणावर सरकारची करडी नजर; प्रत्येक शस्त्रक्रियेचे होणार ऑडिट

admin

admin

Next Post
सिझेरियन प्रसूतीच्या वाढत्या प्रमाणावर सरकारची करडी नजर; प्रत्येक शस्त्रक्रियेचे होणार ऑडिट

सिझेरियन प्रसूतीच्या वाढत्या प्रमाणावर सरकारची करडी नजर; प्रत्येक शस्त्रक्रियेचे होणार ऑडिट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (36)
  • कोकण (68)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,157)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (509)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (117)
  • नाशिक (90)
  • पालघर (51)
  • पालघर (78)
  • पुणे (1,090)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,318)
  • मुंबई (3,658)
  • रत्नागिरी (66)
  • राजकीय (292)
  • रायगड (68)
  • राष्ट्रीय (595)
  • वसई-विरार (74)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (224)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION