• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र मुंबई

विद्यार्थ्यांनो हसत खेळत परिक्षेला सामोरे जा- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुख्यमंत्र्यांनी त्यांच्या लहानपणी शिक्षण घेतलेल्या शाळेतून घेतला पंतप्रधानांच्या 'परिक्षा पे चर्चा' कार्यक्रमात सहभाग

विशेष प्रतिनिधी by विशेष प्रतिनिधी
January 27, 2023
in मुंबई
0
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई  : ज्या शाळेतून शिक्षण घेतले तेथूनच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘परीक्षा पे चर्चा’ या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहिले. ठाणे येथील किसन नगरमधील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आपल्या आठवणी जागवतानाच विद्यार्थ्यांना आणि पालकांना परिक्षेला सामोरे जाताना ताण घेऊन नका असा सल्ला दिला. त्याचबरोबर परिक्षा पे चर्चा कार्यक्रम आयोजित केल्याबद्दल पंतप्रधानांचे त्यांनी आभारही मानले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना दिलेले संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली. परिक्षा पे चर्चा या कार्यक्रमाचे यंदाचे सहावे वर्ष. याकार्यक्रमाच्या माध्यमातून पंतप्रधानांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधतानाच विद्यार्थ्यांना परीक्षा हा उत्सव असून त्यांतून येणाऱ्या परिणामांची भीती बाळगण्याची गरज नसल्याचा संदेश दिला. तसेच अभ्यास कसा करावा, अवघड विषय कसे हाताळावे, तणावाचा सामना कसा करावा, पालकांनी विद्यार्थांशी नक्की कसे वागावे, याबाबत मार्गदर्शन केले.

मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच शाळेला भेट..

दुरदृष्यप्रणालीच्या माध्यमातून झालेल्या या कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्री श्री. शिंदे हे ठाणे येथील महापालिकेच्या शाळा क्रमांक २३ मधून सहभागी झाले. मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच श्री. शिंदे आपल्या शाळेत आले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साह होता. पंतप्रधानांच्या संवादानंतर मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी शाळा क्रमांक २३ च्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला.

मुख्यमंत्री श्री. शिंदे यावेळी म्हणाले, देशालाच एक कुटंब मानून, त्याच्या प्रमुखाच्या नात्यानं प्रचंड कामाच्या व्याप्यातही परिक्षा याविषयावर सातत्याने विद्यार्थ्यांशी संवाद साधणारे पंतप्रधान आपल्याला लाभले याबद्दल मुख्यमंत्र्यांनी श्री. मोदी यांचे आभार मानले. पंतप्रधान श्री. मोदी यांनी विद्यार्थाना दिलेले हे संस्कार त्यांना नक्की उपयुक्त ठरतील. त्यांना अपेक्षित असलेला तणावमुक्त, खेळात रमणारा, वेगवेगळ्या उपक्रमात सहभागी होणारा विद्यार्थी घडावा अशी अपेक्षा त्यांची अपेक्षा आहे. त्यांच्या विचार ऐकणारे विद्यार्थी त्यातून नक्कीच प्रेरणा घेतील आणि परिक्षेदरम्यान येणारा तणाव दूर सारून आपल्या क्षमता हेरून आपलं आयुष्य घडवतील अशी अपेक्षाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी व्यक्त केली.

परिक्षा पे चर्चा कार्यक्रमासाठी सुमारे १५० देशांतील विद्यार्थ्यांनी, ५१ देशातील शिक्षकांनी आणि ५० देशातील पालकांनी नोंदणी केली आहे. देशातील सुमारे ३८ लाख ८० लाख विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. जगभरातील कोट्यवधी लोक आज या परिक्षा पे चर्चा मध्ये सहभागी होताहेत ही अभिमानाची बाब असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात राज्य शासनाच्या माध्यमातून सुधारणा केल्या जात आहेत असे सांगतानाच विद्यार्थ्यांमध्ये चिकाटी, आत्मबल, आत्मविश्वास असला पाहिजे. अपयशामुळे खचून जाऊ नका, यश हमखास मिळतेच असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी आयुष्यात आलेल्या अपयशानंतर खचलो नाही, असे सांगितले.

एक्झाम वॉरियर्स पुस्तक जिल्हा परिषदेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लिहिलेले एक्झाम वॉरियर्स हे पुस्तक ठाणे महानगरपालिकेच्या तसेच राज्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळेतील विद्यार्थ्यांना मोफत उपलब्ध करून देण्यात येईल अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काही विद्यार्थ्यांना प्रातिनिधिक स्वरूपात या पुस्तकाचे वाटप करण्यात आले.

मुख्यमंत्री रमले शाळेच्या आठवणीत..

शाळा क्रमांक २३ विषयी आठवणी जाग्या करतानाच आपले वर्गशिक्षक रघुनाथ परब यांची आठवण मुख्यमंत्र्यांनी सांगितली. त्यावेळी शाळेची आतासारखी इमारत नव्हती तर चाळीत ही शाळा भरायची. शाळेची स्वच्छता स्वत:च करायचो. त्यात वेगळा आनंद होता, असे सांगत मुख्यमंत्री आठवणीत रमले.

कार्यक्रमानंतर मुख्यमंत्र्यांनी शाळेची पाहणी केली. इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरील संगणक लॅब, वर्ग खोल्या, तसेच पिण्याच्या पाण्याच्या जागेची पाहणी केली. बाकावर बसून मुख्यमंत्र्यांनी मुलांशी संवाद साधला. यावेळी ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर उपस्थित होते.

Tags: #ParikshPeCharcha2023#PPC2023CMO MAHARASHTRA
Previous Post

स्तनपान एक अमृततुल्य वरदान..

Next Post

महाराष्ट्र एनसीसी पथकाचे यश गौरवास्पद – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

विशेष प्रतिनिधी

विशेष प्रतिनिधी

Next Post

महाराष्ट्र एनसीसी पथकाचे यश गौरवास्पद - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (45)
  • अहिल्यानगर (16)
  • कृषी (32)
  • कोकण (54)
  • कोल्हापूर (28)
  • कोल्हापूर जिल्हा (7)
  • गुन्हेगारी (1,095)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (473)
  • नवी मुंबई (208)
  • नागपूर (100)
  • नाशिक (75)
  • पालघर (68)
  • पालघर (46)
  • पुणे (1,020)
  • पुणे जिल्हा (205)
  • महाराष्ट्र (1,732)
  • मुंबई (3,305)
  • रत्नागिरी (49)
  • राजकीय (270)
  • रायगड (53)
  • राष्ट्रीय (484)
  • वसई-विरार (48)
  • विशेष लेख (624)
  • सांगली (5)
  • सातारा (17)
  • सिंधुदुर्ग (9)
  • सोलापूर (20)
  • स्पोर्ट्स (206)

Follow Us

Recent News

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0

मुंबई महानगरपालिकेत पुन्हा बदल्यांचे वारे ; महेश पाटील यांच्याकडे करनिर्धारण विभागाचा कार्यभार

0
अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

अतिधोकादायक इमारती तात्काळ रिकाम्या करा; आयुक्तांचा इशारा

July 27, 2026
कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

कारगिल विजय दिनानिमित्त सैनिक रत्न पुरस्काराने सुभेदार सुभाष दरेकर यांचा गौरव

July 27, 2026
वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

वसईत भाजीपाल्याच्या टेम्पोत खैर लाकडाची तस्करी उघड; वन विभागाची धडक कारवाई, वाहनासह मुद्देमाल जप्त

July 27, 2026
इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

इन्स्टाग्रामवर ‘रिझर्व्हेशन हटाओ आंदोलन’ व्हायरल; आरक्षणाच्या मुद्द्यावरून सोशल मीडियात पुन्हा पेटली ठिणगी

July 27, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION