• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन; व्हिडिओ सुनावणी आणि ‘एआय चॅटबॉट’ची नवी सुविधा

admin by admin
November 25, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
जात वैधता प्रमाणपत्र प्रक्रिया आता पूर्णपणे ऑनलाइन; व्हिडिओ सुनावणी आणि ‘एआय चॅटबॉट’ची नवी सुविधा
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : जात प्रमाणपत्र पडताळणीची प्रक्रिया अधिक सुलभ, पारदर्शक आणि गतिमान करण्यासाठी राज्य सरकारने जात वैधता प्रमाणपत्राची संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन करण्याचा निर्णय घेतला आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाने यासंदर्भातील शासन परिपत्रक जारी केले असून, आता अर्ज, आवश्यक कागदपत्रे आणि प्रतिज्ञापत्रे केवळ ऑनलाइन सादर करावी लागणार आहेत. अर्जदारांना त्यांच्या अर्जाची सद्यस्थिती ऑनलाइन पाहता येणार असून, आवश्यकतेनुसार सुनावणीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेतली जाणार आहे. तसेच कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) आधारित चॅटबॉटद्वारे अर्जदारांना मार्गदर्शनाची सुविधा उपलब्ध होणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी), पुणे आणि टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस (टीसीएस) यांच्या सहकार्याने विकसित करण्यात आलेल्या जात प्रमाणपत्र पडताळणी माहिती प्रणाली (CCVIS) द्वारे ही प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. यापूर्वी अंशतः ऑनलाइन असलेली प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असून, अर्जदारांना कागदपत्रांच्या प्रती प्रत्यक्ष कार्यालयात जमा करण्याची गरज राहणार नाही. अर्जासोबत मूळ अथवा प्रमाणित कागदपत्रांच्या स्कॅन प्रती अपलोड कराव्या लागतील. जात नोंदीसंदर्भातील तसेच मानीव दिनांकापूर्वीच्या रहिवासाचा किमान एक पुरावा देणे आवश्यक असून, तो उपलब्ध नसल्यास स्वयंघोषणापत्र सादर करता येणार आहे. अर्जाची तांत्रिक तपासणी, पुराव्यांची पडताळणी आणि आवश्यक असल्यास अतिरिक्त कागदपत्रांची मागणीही ऑनलाइन प्रक्रियेद्वारे केली जाणार आहे.

समितीच्या अध्यक्षांसह सदस्यांकडून अर्जाची पडताळणी पूर्ण झाल्यानंतर सर्व पुरावे समाधानकारक आढळल्यास डिजिटल स्वाक्षरीसह जात वैधता प्रमाणपत्र जारी करण्यात येईल. पुराव्यांची खातरजमा आवश्यक असल्यास संबंधित कार्यालयांशी पत्रव्यवहार किंवा दक्षता पथकाकडून चौकशी केली जाईल. अर्जदाराला सुनावणीची गरज असल्यास ती व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे घेण्यात येईल, तर अत्यंत अपवादात्मक प्रकरणांमध्येच प्रत्यक्ष सुनावणीला परवानगी दिली जाईल. अर्जातील त्रुटींबाबत अर्जदाराला ऑनलाइन प्रणालीद्वारे माहिती देण्यात येईल आणि पाचव्या महिन्यात अंतिम संधी म्हणून ऑनलाइन सुनावणी आयोजित केली जाईल. त्यानंतरही आवश्यक कागदपत्रे सादर न केल्यास प्रकरण निकाली काढले जाईल. परिपत्रकानुसार समितीने शक्यतो ६० दिवसांच्या आत निर्णय देणे अपेक्षित असून, निर्णयाची माहिती एसएमएस, व्हॉट्सॲप किंवा ई-मेलद्वारे अर्जदाराला दिली जाईल. नव्या प्रणालीअंतर्गत सेवा शुल्कही निश्चित करण्यात आले असून, शैक्षणिक प्रयोजनासाठी ₹१००, ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसाठी ₹५००, तर सेवाविषयक, शहरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि शासकीय योजनांसाठी ₹१,००० शुल्क आकारले जाणार आहे. अर्जदारांना www.cvc.barti.in या संकेतस्थळावरून अर्ज करता येणार असून, या डिजिटल व्यवस्थेमुळे कार्यालयीन फेऱ्या, कागदपत्रांची पुनरावृत्ती आणि वेळेचा अपव्यय मोठ्या प्रमाणात कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Previous Post

राज्य मंत्रिमंडळाचे १४ मोठे निर्णय; ४२ लाख शेतकऱ्यांना मोफत धान्य, विद्यार्थ्यांनाही मोठा दिलासा

Next Post

पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे ७ आरोपी जेरबंद

admin

admin

Next Post
पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे ७ आरोपी जेरबंद

पालघरमध्ये बनावट कॉल सेंटरवर पोलिसांचा छापा; परदेशी नागरिकांची फसवणूक करणारे ७ आरोपी जेरबंद

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Browse by Category

  • Uncategorized (48)
  • अहिल्यानगर (18)
  • कृषी (37)
  • कोकण (69)
  • कोल्हापूर (35)
  • कोल्हापूर जिल्हा (14)
  • गुन्हेगारी (1,162)
  • गॅलरी (5)
  • जालना (16)
  • ठाणे (513)
  • नवी मुंबई (221)
  • नागपूर (119)
  • नाशिक (90)
  • पालघर (80)
  • पालघर (52)
  • पुणे (1,100)
  • पुणे जिल्हा (207)
  • महाराष्ट्र (2,384)
  • मुंबई (3,692)
  • रत्नागिरी (67)
  • राजकीय (296)
  • रायगड (71)
  • राष्ट्रीय (612)
  • वसई-विरार (75)
  • विशेष लेख (628)
  • सांगली (5)
  • सातारा (19)
  • सिंधुदुर्ग (12)
  • सोलापूर (21)
  • स्पोर्ट्स (228)
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION

imunify-bot-check
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION