• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र पुणे

राज्यातील यशस्वी खेळाडूंना २२ कोटींची रोख बक्षिसे – उपमुख्यमंत्री अजित पवार

admin by admin
August 30, 2025
in पुणे, विशेष लेख
0
राज्यातील यशस्वी खेळाडूंना २२ कोटींची रोख बक्षिसे – उपमुख्यमंत्री अजित पवार
Share on FacebookShare on WAShare on Twitter

पुणे : “राज्यातील यशस्वी खेळाडूंना दिलेली २२ कोटींची रोख बक्षिसे ही त्यांच्या कष्टाला दिलेली खरी दाद आहे,” असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री तथा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी केले. राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून म्हाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल गजबजून गेले होते. महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या वतीने आयोजित या सोहळ्यात आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय स्तरावरील ३३१ विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. या खेळाडूंना एकूण २२ कोटी ३१ लाख रुपयांची पारितोषिके देण्यात आली.

उपमुख्यमंत्री पवार यांच्या हस्ते १३ आंतरराष्ट्रीय व ३१८ राष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंना पारितोषिके देण्यात आली. सुवर्णपदक विजेत्यांना प्रत्येकी ७ लाख, रौप्यपदक विजेत्यांना ५ लाख आणि कांस्यपदक विजेत्यांना ३ लाख रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले. कार्यक्रमात “मिशन लक्ष्यवेध हाय परफॉर्मन्स सेंटर” या महत्वाकांक्षी योजनेच्या लोगोचे अनावरणही उपमुख्यमंत्री पवार आणि क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे यांच्या हस्ते झाले. या प्रसंगी ऑलिम्पिक पदक विजेता स्वप्नील कुसाळे, आमदार बाबाजी काळे, क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले, सहसंचालक सुधीर मोरे, माजी क्रीडा प्रशासक नामदेव शिरगांवकर, प्रशिक्षक संजय शेटे आदी मान्यवर उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री पवार म्हणाले की, महाराष्ट्राच्या खेळाडूंनी सलग दुसऱ्यांदा राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पदकांचे द्विशतक झळकावले आहे, जे राज्याच्या क्रीडा परंपरेला अभिमानास्पद आहे. “खेळाडूंच्या मेहनतीतून राज्याला मिळालेले यश हे १३ कोटी महाराष्ट्राच्या जनतेचे सामूहिक अभिमानाचे कारण आहे. खेलो इंडियासह इतर आंतरराष्ट्रीय स्पर्धांसाठी क्रीडामंत्री माणिकराव कोकाटे यांनी केलेल्या ५८ कोटींच्या निधीच्या मागणीस तात्काळ मंजुरी दिली आहे. खेळाडूंना आवश्यक त्या सुविधा देऊन महाराष्ट्राने ऑलिम्पिकसह जागतिक स्तरावर वर्चस्व निर्माण करावे, हे आमचे ध्येय आहे,” असे त्यांनी नमूद केले. त्यांनी पुढे सांगितले की, बालेवाडीतील शिवछत्रपती क्रीडा संकुलात देशातील पहिले ऑलिम्पिक संग्रहालय उभारण्याचा निर्णय घेतला आहे. हे संग्रहालय केवळ खेळाडूंच्या कामगिरीचा ऐतिहासिक दस्तऐवज नसून, नवीन पिढीला प्रेरणा देणारे व खेळात शिस्त, मूल्ये व संस्कार रुजवणारे केंद्र ठरणार आहे. क्रीडा मंत्री ॲड. कोकाटे म्हणाले की, “आरोग्यदायी, क्रीडामय महाराष्ट्र हे आमचे ध्येय आहे. राज्याचे नवीन क्रीडा धोरण लवकरच जाहीर करण्यात येईल. हे धोरण खेळाडूंना न्याय देणारे व त्यांच्या प्रगतीस चालना देणारे असेल. त्यातून महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय व ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये अधिकाधिक पदके जिंकतील.”

फेब्रुवारीत उत्तराखंड येथे पार पडलेल्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राने ५५ सुवर्ण, ७० रौप्य व ७६ कांस्य अशी एकूण २०१ पदके पटकावून प्रथम क्रमांक मिळविला होता. या यशाचे स्मरण करत राज्य सरकारने ३१८ राष्ट्रीय विजेते व १३ आंतरराष्ट्रीय विजेते खेळाडूंचा गौरव केला. राज्याच्या क्रीडा धोरण २०१२ नुसार खेळाडू व मार्गदर्शकांना एकूण २८ कोटी ७० लाख रुपयांची पारितोषिके वितरित करण्यात आली. दरम्यान, वार्षिक १६० कोटी रुपये खर्च असलेल्या “मिशन लक्ष्यवेध” या महत्वाकांक्षी योजनेचाही शुभारंभ आज झाला. पहिल्या टप्प्यात ॲथलेटिक्स, हॉकी, कुस्ती, वेटलिफ्टिंग, रोईंग व लॉन टेनिस या सहा क्रीडा प्रकारांना प्राधान्य देण्यात आले असून उच्च दर्जाचे प्रशिक्षण, आधुनिक उपकरणे व तज्ज्ञ प्रशिक्षकांची मदत खेळाडूंना देण्यात येईल. या योजनेमुळे महाराष्ट्राचे खेळाडू आंतरराष्ट्रीय दर्जाच्या सुविधांमध्ये सराव करून जागतिक स्तरावर पदके जिंकण्याची संधी मिळेल. क्रीडा आयुक्त शीतल तेली-उगले यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी राज्यातील क्रीडा विकासाची पार्श्वभूमी, केंद्र व राज्य शासनाच्या योजनांचा उल्लेख केला. आभारप्रदर्शन सहसंचालक सुधीर मोरे यांनी केले.

Previous Post

मराठा आंदोलक आक्रमक; अत्यावश्यक काम असेल तरच सीएसएमटीवरून प्रवास करावा, मध्य रेल्वे प्रशासनाकडून प्रवाशांना आवाहन

Next Post

हजारो मराठा आंदोलकांची रात्र फलाटावरच, कितीही अडचणी आल्या तरी निर्धार कायम..

admin

admin

Next Post
हजारो मराठा आंदोलकांची रात्र फलाटावरच, कितीही अडचणी आल्या तरी निर्धार कायम..

हजारो मराठा आंदोलकांची रात्र फलाटावरच, कितीही अडचणी आल्या तरी निर्धार कायम..

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,030)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,202)
  • मुंबई (2,973)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (376)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! इराण-अमेरिका तणाव तीव्र, इंधन दरवाढीची शक्यता

April 18, 2026
शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

शिरोड्यात ७ कोटींची ‘व्हेल उलटी’ जप्त; चार जणांना रंगेहात अटक

April 18, 2026
राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

राज्यात १७ लाख कर्मचाऱ्यांचा बेमुदत संपाचा इशारा; २१ एप्रिलपासून कामकाज ठप्प होण्याची शक्यता

April 18, 2026
महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

महिला आरक्षण विधेयक फेटाळल्याने केंद्र सरकारला धक्का; आज पंतप्रधान मोदींचे राष्ट्राला संबोधन

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION