• मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
    • मुंबई
    • नवी मुंबई
    • कोकण
      • ठाणे
      • पालघर
      • रत्नागिरी
      • रायगड
    • कोल्हापूर
      • कोल्हापूर जिल्हा
      • सांगली
      • सिंधुदुर्ग
    • पुणे
      • पुणे जिल्हा
      • सातारा
      • सोलापूर
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
No Result
View All Result
Maharashtra Crime Times
No Result
View All Result
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta
Home महाराष्ट्र

मुंबईतील राणीबागमध्ये लवकरच भरणार ‘वार्षिक पुष्पोत्सव’!

admin by admin
February 2, 2026
in महाराष्ट्र, मुंबई
0
मुंबईतील राणीबागमध्ये लवकरच भरणार ‘वार्षिक पुष्पोत्सव’!
Share on FacebookShare on WAShare on Twitter

मुंबई : शिशिर ऋतूची चाहूल लागली की मुंबईकरांना वेध लागतात ते ‘मुंबई पुष्पोत्सवाचे’. घड्याळाच्या काट्यावर आणि वाऱ्याच्या वेगाने धावणाऱ्या मुंबईकरांसाठी ‘मुंबई पुष्पोत्सव’ म्हणजे एक सुगंधी पर्वणी असते. यंदा हा पुष्पोत्सव येत्या ६ ते ८ फेब्रुवारी होणार आहे. असून यामध्ये विविध प्रजातींची रंगीबेरंगी फुलझाडे, फळझाडांची रोपे, औषधी वनस्पती तसेच विविध ऋतूंमध्ये आढळणारी फुले आदी मिळून सुमारे ५ हजार रोपांचा ‘मुंबई पुष्पोत्सवात’ समावेश असतो. पर्यावरणाची आवड आणि फुलझाडांवर प्रेम करणाऱ्या पर्यावरणप्रेमींसाठी पुष्पोत्सवात उद्यानविषयक साहित्याची विक्री, झाडांसाठी लागणारी खते आदींची दालनेही येथे खुली करण्यात येणार आहेत. या तीन दिवसांच्या ‘मुंबई पुष्पोत्सवात’ नागरिकांना मोफत प्रवेश देण्यात येणार आहे.

मुंबई महानगरपालिका आणि वृक्ष प्राधिकरण यांच्या संयुक्त विद्यमाने भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालयात अर्थात राणीबाग येथे येत्या ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या तीन दिवसांच्या कालावधीत उद्यानविद्या प्रदर्शन अर्थात ‘मुंबई पुष्पोत्सव’ आयोजित करण्यात येणार आहे. येत्या ६ फेब्रुवारी २०२६ रोजी सकाळी मुंबई पुष्पोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. त्यानंतर रात्री ८ वाजेपर्यंत पुष्पोत्सव सर्वांसाठी खुला राहील. उर्वरित दोन दिवस म्हणजेच ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत ‘मुंबई पुष्पोत्सव’ नागरिकांसाठी खुला असेल. यंदाचा हा २९ वा पुष्पोत्सव आहे. मुंबई महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी आणि अतिरिक्त आयुक्त (पूर्व उपनगरे) डॉ. अविनाश ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच उप आयुक्त (उद्याने) अजितकुमार आंबी आणि उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांच्या देखरेखीखाली ‘मुंबई पुष्पोत्सव’ भरविण्यात येत आहे. मुंबई पुष्पोत्सवासोबतच ६ ते ८ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत उद्यान विषयक कार्यशाळाही आयोजित करण्यात येणार आहेत. या कार्यशाळेमध्ये बागकाम कसे करावे, झाडांची निगा कशी राखावी, रोपांना, झाडांना, वेलींना कोणते खत कधी व किती प्रमाणात द्यावे, याविषयी अभ्यासपूर्ण प्रशिक्षण देण्यात येणार आहे. मुंबई पुष्पोत्सवात फुलझाडांची सुरेख मांडणी आणि आकर्षक सजावट केली जाते. यासोबतच दरवर्षी एक खास संकल्पना घेवून पुष्पोत्सव साजरा केला जातो. गतवर्षी भारताच्या राष्ट्रीय प्रतीकांचे आकर्षक सादरीकरण करण्यात आले होते. विविध फुलांच्या मनमोहक रचनांमधून राष्ट्रध्वज, भारतरत्न पुरस्काराची प्रतिकृती तसेच राष्ट्रीय फळ आंब्याची रचनाही झेंडूच्या फुलांनी साकारली होती. या सजावटीने मुंबईकरांचे लक्ष वेधून घेतले होते. यंदाच्या मुंबई पुष्पोत्सवातही आगळीवेगळी आणि आकर्षक संकल्पना राबविण्यात येणार आहे. सलग तीन दिवस सुरू राहणाऱ्या या पुष्पोत्सवाचा मुंबईकरांनी आनंद घ्यावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.

विशेष आकर्षणे :

  • विविध प्रकारच्या फुलांच्या प्रतिकृती.
  • ५,००० हून अधिक वनस्पतींच्या प्रजाती आणि फळांची झाडे.
  • उद्यानविषयक साहित्य आणि खतांची विक्री.
  • बागकाम प्रेमींसाठी विशेष कार्यशाळा (शुल्क लागू).
Previous Post

बनावट साधूंना नो एंट्री! नाशिकमध्ये कुंभमेळ्यासाठी साधू-संन्याशांना अधिकृत ओळखपत्र बंधनकारक

Next Post

जंगलांच्या प्रभावी संरक्षणासाठी वन विभागाचे महत्वपूर्ण पाऊल!

admin

admin

Next Post
जंगलांच्या प्रभावी संरक्षणासाठी वन विभागाचे महत्वपूर्ण पाऊल!

जंगलांच्या प्रभावी संरक्षणासाठी वन विभागाचे महत्वपूर्ण पाऊल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Follow US

Our Social Links

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026

This Newspaper PRINTED, PUBLISHED & OWNED by EDITOR Mr. Rakesh Shankar Gore. Registrar of Newspaper for INDIA (R.N.I.) No. 105858/2010 (Government of India). Editors and Directors do not necessarily agree with the content published on this website.(In Jurisdiction of Mumbai)

Browse by Category

  • Uncategorized (44)
  • अहिल्यानगर (14)
  • कृषी (28)
  • कोकण (43)
  • कोल्हापूर (23)
  • कोल्हापूर जिल्हा (6)
  • गुन्हेगारी (1,029)
  • गॅलरी (5)
  • जालना (3)
  • ठाणे (433)
  • नवी मुंबई (196)
  • नागपूर (89)
  • नाशिक (62)
  • पालघर (59)
  • पालघर (43)
  • पुणे (907)
  • पुणे जिल्हा (192)
  • महाराष्ट्र (1,200)
  • मुंबई (2,972)
  • रत्नागिरी (37)
  • राजकीय (230)
  • रायगड (35)
  • राष्ट्रीय (373)
  • वसई-विरार (9)
  • विशेष लेख (618)
  • सांगली (5)
  • सातारा (15)
  • सिंधुदुर्ग (7)
  • सोलापूर (18)
  • स्पोर्ट्स (186)

Follow Us

Recent News

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
  • Trending
  • Comments
  • Latest

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची पत्रकारिता..

January 27, 2023

छ. शिवाजी महाराज आणि मुस्लिम समाज..

February 21, 2023

प्रो गोविंदा लीग २०२४ ची घोषणा; आयपीएल प्रमाणे होणार दहीहंडीचे आयोजन

July 24, 2024

कार्डिनल ग्रेशियस हायस्कूल बांद्रा पूर्वमध्ये ‘द स्क्वॉड अँकेडमी’ चा सलग ६ तास स्केटिंगचा विक्रम

August 16, 2024
महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

महापुरुषांची जयंती कशासाठी साजरी करायची?

1

कामगाराच्या हिताच्या योजना केंद्र व राज्य शासन एकत्रितपणे समन्वयातून राबविण्यात येणार

0

उदय सामंतांचा ताफा अडवण्याचा शिवसैनिकांचा प्रयत्न; धुळ्यात बंडखोरांविरोधात शिवसैनिक रस्त्यावर, पोलिसांनी घेतलं ताब्यात

0

टिटवाळा येथे शिक्षिकेची विद्यार्थ्याला बेदम मारहाण

0
मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

मंत्र्यांसोबत फक्त एकाच व्यक्तीस परवानगी; मंत्रालयात प्रवेशासाठी कडक नियम लागू

April 18, 2026
रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

रणसिंग महाविद्यालयात रस्ते सुरक्षिततेवर ‘प्रयास’ कार्यक्रम संपन्न; विद्यार्थ्यांना महत्त्वाचे मार्गदर्शन

April 18, 2026
नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

नवी मुंबईत मालमत्ता कराची ई-बिले उपलब्ध; व्हॉट्सअॅपवरूनही काही मिनिटांत भरणा

April 18, 2026
‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

‘ठाणे झोपडपट्टीमुक्त करणार..’, एकनाथ शिंदेंचा संकल्प

April 18, 2026
  • मुख्य पेज
  • राष्ट्रीय
  • महाराष्ट्र
  • राजकीय
  • गुन्हेगारी
  • विशेष लेख
  • स्पोर्ट्स
  • गॅलरी
  • ई-पेपर
  • संपर्क
  • MctVarta

© 2023 MaharashtraCrimeTimes Part of RG VISION